27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषबजबजपुरी! मुंबईतील खड्डे बुजता बुजेना

बजबजपुरी! मुंबईतील खड्डे बुजता बुजेना

Google News Follow

Related

मुंबईतील प्रमुख रस्ते आणि अंतर्गत मार्ग यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी आणि अपघातांचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी वापरण्यात येणारे कोल्डमिक्स अपेक्षेप्रमाणे प्रभावी ठरत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता खड्डे बुजवण्यासाठी अन्य पर्यायाचा विचार करावा लागणार आहे.

रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी आतापर्यंत अनेक पर्याय वापरण्यात आले आहेत. मात्र सर्वच पर्याय अपयशी ठरत आहेत. खड्डे दुरुस्तीसाठी आता पर्यंत कोल्डमिक्स, हॉटमिक्स आदी पारंपारिक पर्याय वापरण्यात आले. तसेच जेट पॅचर मशिननेही खड्डे दुरुस्ती करण्यात आली. मात्र हे पर्यायही यशस्वी ठरले नाहीत. त्यानंतर ऑस्ट्रियन- इस्त्रायली तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला. मात्र खड्डे बुजवण्यासाठी कोणतीही उपाय योजना काम करत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता खड्डे बुजवण्यासाठी दुसरे पर्याय शोधणे गरजेचे आहे, असे मत जाधव यांनी व्यक्त केले आहे.

हे ही वाचा:

पॅरालिम्पिक २०२०: प्रवीण कुमारने विक्रमी कामगिरी करत पटकावले रौप्य पदक

रोनाल्डोचे विश्वविक्रमी ‘गोल’ साध्य!

घरात जुन्या नोटा, बँकेत लाखो रुपये

रशियाच्या ‘झापड’ मध्ये भारताचा सहभाग

खड्ड्यांवरून भाजपने गुरुवारी आंदोलन केले. सत्ताधारी शिवसेनाही खड्ड्यांच्या दुरुस्तीबाबत प्रश्न उपस्थित करत आहे. मात्र महापालिकेच्या नोंदीनुसार पालिकेच्या रस्त्यांवर आतापर्यंत ८४४ खड्डे आहेत, तर त्यातील ५६८ दुरुस्त झाले असून ३१३ खड्डे शिल्लक आहेत. मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांचा फटका वाहनचालकांना बसत असून विशेषतः दुचाकी स्वारांना त्याचा फटका अधिक बसत आहे. पावसाळ्यामध्ये या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अंदाज न आल्याने वाहने खड्ड्यांमध्ये आपटून भीषण अपघात होतात किंवा वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा