32 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषकुलाबा केंद्राने जिंकली बिपीन आंतरकेंद्र फुटबॉल स्पर्धा

कुलाबा केंद्राने जिंकली बिपीन आंतरकेंद्र फुटबॉल स्पर्धा

सजीर इद्रिसी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला तसेच स्पर्धेत सर्वाधिक गोल केले.

Google News Follow

Related

बिपीन फुटबॉल अ‍ॅकॅडमी आयोजित ३४ व्या आंतरकेंद्र (१६ वर्षांखालील मुले) फुटबॉल स्पर्धेत कुलाबा केंद्राने बाजी मारली. अंतिम फेरीत वसई-विरार केंद्रावर २-१ असा विजय मिळवत त्यांनी बिपीन फुटबॉल ट्रॉफी उंचावली.

दहिसर येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदानात झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तन्मय ठाकूर (१८व्या मिनिटाला) आणि सजीर इद्रिसीच्या (36व्या मिनिटाला) अप्रतिम गोलांच्या जोरावर दक्षिण मुंबईतील केंद्राने विजय मिळवला. शेवटच्या, 40व्या मिनिटाला गोलकीपर नरसिंहा वाल्मिकीच्या स्वयंगोलमुळे थोडी रंगत निर्माण झाली. मात्र, कुलाबासाठी सुरुवातीची आघाडी निर्णायक ठरली. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत कुलाबा केंद्राने उल्हासनगर केंद्रावर २-० अशी मात केली. दुसर्‍या सामन्यात वसई-विरार केंद्राने कुर्ला केंद्राचा पेनल्टी शूटआउटमध्ये ४-३ असा पराभव केला.

bipin football1

वैयक्तिक पुरस्कारांमध्ये कुलाबा केंद्राच्या सजीर इद्रिसी याने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूसह स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू असे दोन्ही पुरस्कार पटकावले. त्याचा सहकारी नरसिंहा वाल्मिकी हा सर्वोत्तम गोलकीपर ठरला. प्रतिभावंत खेळाडूचा मान शुभम माने याने मिळवला. बोरीवली केंद्राने फेअर प्ले अवॉर्ड पटकावले.

हे ही वाचा:

साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांची संपत्ती जप्त

‘संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ का म्हणू नये’ याचे उत्तरच अजित पवारांनी दिले नाही

फरफटत नेलेल्या तरुणीबाबत मैत्रिणीने केले विचित्र विधान, चौकशी होणार

सोमालियामध्ये दोन कारमध्ये स्फोट, ९ ठार

माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक स्टीव्हन डायस यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण झाले. यावेळी मुंबई फुटबॉल असोसिएशनचे महासचिव सुधाकर राणे, अभिनेता संजय सुरी आणि बिपीन फुटबॉल अकॅडमीचे अध्यक्ष सतीश उचिल आदी मान्यवर उपस्थित होते.

बिपिन फुटबॉल स्पर्धेचे आयोजन गेली अनेक वर्षे केले जात असून या माध्यमातून उदयोन्मुख खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असतो. सुरेंद्र करकेरा यांनी या स्पर्धेचे इतकी वर्षे अत्यंत उत्तम आयोजन केले आहे. त्यांनीच ही स्पर्धा सुरूही केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा