दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत २०० किलोग्राम कोकेन जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत तब्बल २००० कोटी रुपये इतकी आहे. दिल्ली पोलिसांची ड्रग्ज विरोधातील एका आठवड्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने, यापूर्वी महिपालपूर येथून ५६२ किलो ड्रग्ज जप्त केले होते, ज्याची किंमत तब्बल ५,००० कोटींच्या घरात होती.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गुरुवारी (१० ऑक्टोबर) पश्चिम दिल्लीतील रमेश नगर भागातील एका दुकानावर छापा टाकत ड्रग्ज जप्त केले. स्नॅक्सच्या प्लास्टिकच्या पाकिटांमध्ये हे ड्रग्ज होते, ज्यावर ‘टेस्टी ट्रीट’ आणि ‘चटपाटा मिक्स्चर’ असे लिहिले गेले होते. अशी एकूण २०-२५ पॅकेट जप्त केले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा :
अल जझीराचा तथाकथित पत्रकार देत होता भारतविरोधी घोषणा!
नाशिकमध्ये आर्टिलरी सेंटरमध्ये स्फोट होऊन दोन अग्निवीरांचा मृत्यू
मसुरीतील चहा थुंकी प्रकरण: मोहम्मद नौशाद आणि मोहम्मद हसनला बेड्या!
महादेव बेटिंग ऍप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरला दुबईतून अटक