दिल्ली पोलिसांच्या पथकाला पुन्हा एकदा मोठे यश हाती लागले आहे. पंजाबमधील अमृतसर येथे टाकलेल्या छाप्यात तब्बल १० कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी रविवारी (६ऑक्टोबर) सांगितले. दिल्ली पोलिसांनी याच पथकाने दोन दिवसांपूर्वी तब्बल ५००० कोटी हून अधिक रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले होते. यानंतर आता अमृतसरमध्ये मोठी कारवाई करत १० कोटींचे कोकेन जप्त केले आहे.
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली अंमली पदार्थ प्रकरणी अमृतसर मधून अटक करण्यात आलेला आरोपी जितेंद्र पाल सिंगने दिलेल्या माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. आरोपीच्या माहितीनुसार पथकाने नेपाळ सीमेजवळील अमृतसरजवळील एका गावात छापा टाकला आणि आणि १० कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले. या कारवाईत टोयोटा फॉर्च्युनर कारही जप्त करण्यात आली.
२ ऑक्टोबर रोजी, दिल्ली पोलिसांनी दक्षिण दिल्लीतील महिपालपूर येथून ५६० किलोग्रॅम कोकेन आणि ४० किलोग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त केला, ज्याची किंमत अंदाजे ५,६२० कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी तुषार गोयल , जितेंद्र पाल सिंग, उर्फ जस्सी, हिमांशू कुमार, औरंगजेब सिद्दीकी आणि भरत कुमार जैन या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याचा सूत्रधार तुषार गोयल असल्याची माहिती आहे. गोयल याचे आंतरराष्ट्रीय संबंध असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हे ही वाचा :
मिरा भाईंदर, वसई विरारमध्ये दोन वर्षांत ३२३७ महिला बेपत्ता
‘श्रेष्ठ महाराष्ट्र–विकसित महाराष्ट्रा’च्या संकल्पनासाठी राज्यात ‘सजग रहो’ अभियान!
बापरे! महिलेच्या पोटातून निघाला २ किलोचा ‘केसांचा गोळा’
भोपाळमधून १,८०० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त, दोघांना अटक!