बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बीकेसी चुनाभट्टी या पुलाखाली असलेल्या झोपड्यांत एक नाग आढळला. झोपडीच्या पत्र्यातून या नागाला बाहेर काढण्यात सर्पमित्रांना यश आले आहे. यासंदर्भातील व्हीडिओ व्हायरल झाला असून त्यात या नागाला कसे बाहेर काढण्यात आले ते दिसते आहे.
८ जुलैला दुपारी ३:२५ला बी.के.सी येथून एका कामगाराने वापरा संस्थेच्या रेस्क्यू कॉलवर फोन करून साप दिसल्याचे सांगितले.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री म्हणाले, सर्वसामान्यांचे सरकार! ताफ्याच्या प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट
गोळीबारात जखमी झालेले जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे मृ्त्युमुखी
‘मविआ सोडा, मोदींशी चर्चा करा’
सदर बातमी मिळताच वापरा संस्थेचे सर्प मित्र अतुल कांबळे हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी नागाबद्दलची माहिती घेतली. तेव्हा तो नाग एका कामगाराच्या पत्र्याच्या घरात दडून बसला होता. हा साप हा ३ फूट लाबींचा नाग जातीचा भारतामधील चार विषारी सापा पैकी हा एक साप असल्याचे स्पष्ट होत आहे.
सदचा साप हा सुरक्षित असून त्याला कुठलीही ईजा झालेली नव्हती. या नागाला सुरक्षित वातावरणात सोडण्यात आले आहे. या व्हीडिओत दिसते आहे की, पत्र्यांच्या मध्ये हा साप लपला होता. त्याला सर्पमित्रांनी बाहेर काढले. त्याला पकडून बाहेर आल्यानंतर त्याने फणा काढून आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. पण सर्पमित्र कांबळे यांनी त्याला व्यवस्थित हाताळले आणि नंतर त्याला एका पाण्याच्या बाटलीत हळुच बंद केले. नंतर त्याला योग्य अधिवासात नेऊन सोडण्यात आले.
अतुल कांबळे अशा पद्धतीने शहरी भागात आलेल्या सापांना बाहेर काढून लोकांना दिलासा देतात. मध्यंतरी बीकेसीत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात आलेल्या सापालाही त्यांनी बाहेर काढून योग्य अधिवासात सोडले होते.