मुंबईमधील वरळी कोळी वाड्यातील मच्छिमारांनी कोस्टल रोडचे काम बंद पाडले आहे. मच्छिमारांच्या मागण्या मान्य न करता मनमानी पद्धतीने कोस्टल रोड प्राधिकरण काम करत असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमारांनी केला आहे. मच्छिमारांनी अचानक आंदोलन केल्यामुळे मोठ्या संख्येने पोलीस आणि आरसीएफ तैनात करण्यात आले आहे.
कोस्टल रोड प्राधिकरणाने परस्पर समुद्रात मासेमारी करण्याच्या ठिकाणी बार्जेस नांगरून ठेवल्यामुळे मच्छिमारांना मासेमारी करण्यास अडचणी होत आहेत. तसेच या बार्जेसमुळे मासेमारीच्या जाळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती नितेश पाटील आणि रुपेश पाटील यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदी झाले शिवतांडव स्तोत्रात तल्लीन
‘त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढे त्याने कमावले आहे’
पोलिस कल्याण निधीतून पोलिसांना ७५० रुपयांची भरगच्च ‘दिवाळी भेट’
मच्छिमारांनी आतापर्यंत समतोल भूमिका घेतली होती, परंतु आता कोस्टल रोड प्राधिकरणाच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी आता मच्छिमारांनी अशी तीव्र भूमिका घेतली आहे. तसेच मच्छिमारांच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत कोस्टल रोडचे काम बंद करण्याची भूमिका त्यांनी आता घेतली आहे.
मासेमारीसाठी जाण्यासाठी समुद्रातील मार्गात असलेल्या दोन पिलारमधील अंतर ६० मीटर ठेवण्याची मागणी मच्छिमारांनी केली असून तसे न झाल्यास आणि भविष्यात काही दुर्घटना झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवालही त्यांनी विचारला आहे.