मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सीलिंकला जोडणाऱ्या कनेक्टरचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा कोस्टल रोड तीन-चार टप्यात सुरु करून आज सीलिंकला जोडण्याचे महत्वपूर्ण काम झाले आहे. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास आता केवळ १० मिनिटात पूर्ण होणार आहे. हा प्रवास सुखकर, जलद होणार असून यातून इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि वेळ वाचणार आहे. तसेच वर्सोवा ते विरार असा हा प्रकल्प आम्ही पुढे नेत आहोत. मरीन ड्राईव्ह ते वर्सोवा हे अंतर केवळ ४० मिनिटात पूर्ण होणार आहे. पुढे पालघर पर्यंत हा प्रकल्प नेण्यात येणार आहे. वाढवण हे जे सर्वात मोठे बंदर होणार आहे, त्यासाठी सुद्धा या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर हे प्रकल्प पूर्णत्वास गेले असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हेही वाचा..
संजौली मशिदीच्या विरोधात व्यापारीही उतरले, बाजारपेठा बंद !
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त अजमेर शरीफ दर्ग्याच्यावतीने ४ हजार किलो अन्नवितरण
योगी आदित्यनाथ यांचा राहुल गांधींवर प्रहार
जम्मू- काश्मीर: कुपवाडातील जंगलामधून लष्कराला सापडला मोठा शस्त्रसाठा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकल्पाबद्दल पूर्ण समाधान आहे. आपण मुख्यमंत्री असताना दिल्लीतून यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या आणल्या होत्या. आधीचे मुख्यमंत्री दिल्लीला जायचे आणि हात हलवत परत यायचे. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रकल्पाला सुरुवात झाली. यामध्ये कोळी बांधवांचा प्रश्नही मार्गी लावण्यात आला आहे. दुसरा टप्पा सुद्धा लवकरच सुरु होईल. यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या लोकार्पण सोहळ्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एकाच मोटारीतून या मार्गावरून प्रवास केला. मोटारीचे सारथ्य उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.