पोरबंदरमध्ये तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला अपघात; तीन क्रू मेम्बर्सचा मृत्यू

हेलिकॉप्टर लँडिंग करताना कोसळले

पोरबंदरमध्ये तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला अपघात; तीन क्रू मेम्बर्सचा मृत्यू

गुजरातमधील पोरबंदरमध्ये तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची माहिती समोर अली आहे. हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात झाला आहे. माहितीनुसार, या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पायलट आणि सहवैमानिकाचा समावेश आहे. तर, एक क्रू मेंबर देखील मृत पावला आहे. या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रविवार, ५ जानेवारी रोजी दुपारी गुजरातच्या पोरबंदर विमानतळावर भारतीय तटरक्षक दलाचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर लँडिंग करताना कोसळले. यातील त्यात तीन क्रू सदस्य ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोरबंदरचे पोलिस अधीक्षक भगीरथ सिंह जडेजा यांनी सांगितले की, ही घटना दुपारी १२.१० वाजता घडली. हा अपघात नेहमीच्या प्रशिक्षणादरम्यान झाला.

हे ही वाचा..

दिल्लीहून ४० मिनिटांत मेरठ गाठता येणार; दिल्ली- मेरठ नमो भारत कॉरिडॉरचे उद्घाटन

महाकुंभमेळा परिसरात १० हजारहून अधिक रुग्णांना वैद्यकीय सेवा

बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असलेल्या एका बांगलादेशी व्यक्तीला दिल्लीतून अटक

छत्तीसगडमधील अबुझमाडमध्ये चार नक्षलवाद्यांचा खात्मा

पुढे सिंह असंही म्हणाले की, पोरबंदर विमानतळावर लँडिंग दरम्यान भारतीय तटरक्षक दलाचे प्रगत हलके हेलिकॉप्टर (ALH) क्रॅश झाले, ज्यामध्ये तीन क्रू सदस्य होते. ते म्हणाले की, तिन्ही क्रू मेंबर्सला हेलिकॉप्टरमधून बाहेर काढण्यात आले आणि गंभीर भाजलेल्या पोरबंदर येथील रुग्णालयात नेण्यात आले. कमला बाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश कन्मिया यांनी सांगितले की, तिन्ही क्रू मेंबर्सचा रुग्णालयात मृत्यू झाला.

Exit mobile version