पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील कोळसा खाणीत भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवार, ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. भादुलिया ब्लॉकमधील कोळसा खाणीत ही घटना घडली. या स्फोटात सहाजण ठार झाले. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पश्चिम बंगालमधील बीरभूमी येथील गंगारामचक गावातील खासगी कोळसा खाणीत ब्लास्टिंग सुरू होती. यावेळी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास स्फोट होऊन हा अपघात झाला. स्फोटामुळे खाण कोसळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे हा अपघात अधिक धोकादायक झाला. या दुर्घटनेत सहा जण ठार झाले आहेत.
#WATCH | Rana Mukherjee, Bolpur ASP says "After the explosion in the mining area, we reached here and found 6 bodies, three people were injured who are undergoing treatment in the hospital and the West Bengal government has announced to give jobs to the families. The company will… https://t.co/pq8GNpZrxJ pic.twitter.com/8gxuLt0cYM
— ANI (@ANI) October 7, 2024
बोलपूर पोलीस अधिक्षक राणा मुखर्जी यांनी माहिती देताना म्हटले की, “खाण परिसरात स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी पोहचलो. आतापर्यंत सहा मृतदेह सापडले तर, तीन लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पश्चिम बंगाल सरकारने या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबांना नोकरी देण्याची घोषणा केली आहे. तसेच या प्रकरणी स्फोटामागील कारणाचा पुढील तपास फॉरेन्सिक टीम करेल.”
हे ही वाचा :
‘हिंदू मुलींनी’ मुस्लिमांकडून मेहंदी न लावून घेण्याची घेतली शपथ!
बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण, आरोपींवर १० लाखांचं बक्षीस!
सुनीता विल्यम्स स्पेस स्टेशनमधून करणार मतदान
मणिपूरमधून शस्त्रे, स्फोटकांचा मोठा साठा जप्त
यापूर्वी बीरभूम जिल्ह्यातील नलहाटी पोलिस स्टेशन हद्दीतील महेश गुडिया गावात दगड फोडताना दगडाच्या खाणीत अडकून काम करणाऱ्या तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता.