पालघर जवळ मालवाहतूक करणाऱ्या मालगाडीचे डबे रुळावरून घसरून उलटले आहेत.गुजरावरून मुंबईकडे येणाऱ्या मालवाहतूक रेल्वेचे डबे घसरले आहेत.या दुर्घटनमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातहुन मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला.या अपघातात मालगाडीचे दोन ते तीन डबे रुळावरून घसरले आणि पलटी झाले.या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.परंतु, पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंत धावणारी उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल एक्सप्रेसवर याचा मोठा परिणाम होणार आहे.
हे ही वाचा:
श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी ३००० पानी आरोपपत्र; आफताब विरोधात ठोस पुरावे
नरेंद्र मोदी पुन्हा बसणार ध्यानसाधनेला!
पुण्यात बनावट कागदपत्रांसह वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक
देवाचा अवतार म्हणवून घेणाऱ्या खर्गेंवर सुद्धा भ्रष्टलेख लिहा!
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर रेल्वे स्थानाजवळ येत असताना प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून चौथ्या रुळावर क्रॉसिंग करत असताना मालगाडीचे डबे घसरले आणि दोन ते तीन डबे पलटी झाले.याचे फोटो देखील समोर आले आहेत.फोटोमध्ये डबे रुळावरून पलटी झाल्याचे दिसत आहे.डब्याची चाके देखील निखळून पडल्याचे दिसत आहे.तसेच डब्यातील सामान खाली पडले आहे.दरम्यान, रेल्वे प्रशासन आणि येथील टेक्निकल टीम ही घटनास्थळी दाखल झाली असून मालगाडीचे घसरलेले डब्बे पुर्वरत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु आहे. या दुर्घटनेमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.