अहमदाबाद-मुंबई डबल डेकर एक्स्प्रेसचे दोन डबे झाले वेगळे!

ट्रेनच्या कपलरमध्ये बिघाड झाल्याने दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती

अहमदाबाद-मुंबई डबल डेकर एक्स्प्रेसचे दोन डबे झाले वेगळे!

​​गुजरातमधील वडोदरा येथील गोथंगम यार्डजवळ गुरुवारी (१५ ऑगस्ट) सकाळी अहमदाबाद-मुंबई डबल डेकर एक्स्प्रेसचे दोन डबे चालत्या ट्रेनमधून अचानक वेगळे झाले. एक्सप्रेसचे डबे चालत्या ट्रेनपासून वेगळे झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ट्रेनच्या कपलरमध्ये बिघाड झाल्यामुळे ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. जेव्हा ही घटना घडली तेव्हा ट्रेनचा वेग कमी होता, त्यामुळे एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही.

८:३० च्या सुमारास ही घटना घडली. ट्रेनच्या कपलरमध्ये बिघाड झाल्याने एक्सप्रेसचे डबे क्रमांक ०७ आणि ०८ चालत्या ट्रेनमधून वेगळे झाले. रेल्वे अचानक थांबल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली.

रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आवश्यक तपास सुरू केला आहे. रेल्वेच्या कपलरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही घटना घडल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या घटनेनंतर रेल्वेचा प्रवास सुरू ठेवता यावा यासाठी रेल्वे कर्मचारी पर्यायी कपलर जोडण्याचे काम करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे अहमदाबाद-मुंबई दरम्यानच्या रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

हे ही वाचा :

आता केजरीवालांना हटवा!

कोलकाता बलात्कार प्रकरण, अज्ञातांकडून रुग्णालयाची तोडफोड !

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध

बांगलादेशातील हिंदू, महिला अत्याचार, समान नागरी कायदा…पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केले परखड भाष्य !

Exit mobile version