भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिका गमावल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड यांना लक्ष्य केले जात आहे. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची जेव्हा नेमणूक केली गेली, तेव्हा त्यांच्याकडून खूप आशा होत्या. द्रविडच्या प्रशिक्षणाखाली ज्युनिअर क्रिकेट संघाची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. मात्र वरिष्ठ क्रिकेट संघाच्या स्तरावर त्यांना म्हणावे तसे यश मिळू शकलेले नाही. आता वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत पराभव पत्करावा लागल्यानंतर पुन्हा त्यांच्या प्रशिक्षकपदाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यातच या वर्षी भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होत असल्याने भारतीय संघाकडून खूप अपेक्षा आहेत.
भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान पहिला कसोटी सामना अनिर्णित झाला होता. त्यानंतर एकदिवसीय मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा एकतर्फी पराभव झाला होता आणि आता टी २० मालिका गमवावी लागली. गेल्या वर्षीची टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि या वर्षीच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पात्र न ठरू शकलेल्या वेस्ट इंडिज सारख्या संघाविरुद्ध पराभूत होण्याची नामुष्की भारतावर आली. भारताला टी२० मालिकेत ३-२ने पराभूत व्हावे लागले. सन २०१७नंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडिजने टी२० मालिकेत भारताला पराभूत केले.
हे ही वाचा:
अमेरिकेचे विमान तीन मिनिटांत १५ हजार फूट खाली; प्रवाशांची भीतीने गाळण
पंतप्रधान मोदींकडून ‘विश्वकर्मा योजने’ची घोषणा !
मेरे प्यारे परिवारजन… म्हणत पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासाचा लेखाजोगा मांडला
शरद पवार हे I.N.D.I.A. आघाडीतील भीष्म की शल्य?
टी २० विश्वचषक २०२१ स्पर्धा संपल्यानंतर रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. त्यानंतर राहुल द्रविड यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाखाली पहिली मालिका भारतात न्यूझीलंडविरुद्ध झाली. टी-२० मालिकेत भारताने न्यूझीलंडचा ३-०ने धुव्वा उडवला. मात्र पहिली कसोटी मालिका अनिर्णित होणे, हे एका पराभवापेक्षा कमी नव्हते. या कसोटी मालिकेत भारताने न्यूझीलंडवर १-०ने मात केली. त्यानंतर २०२१मध्येच भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला. तिथे कसोटी मालिका भारताने १-३ने गमावली. तर, एकदिवसीय मालिकेतही दक्षिण आफ्रिकेने भारताचा ३-०ने धुव्वा उडवला. त्याचवेळी भारतात वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या झालेले एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत ३-०ने भारताने विजय मिळवला. तर, श्रीलंकेला टी २०मध्ये ३-०ने आणि कसोटी मालिकेत २-०ने पराभवाची चव चाखायला लावली.
सन २०२२मध्ये टी २० एशिया कपमधील सुपर ४मध्ये भारताला श्रीलंका आणि पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर सन २०२२मध्येच झालेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ कसाबसा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला. परंतु त्याला इंग्लंडकडून पराभूत व्हावे लागले. या विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय टी २० सामन्यात अनेक बदल करण्यात आले. जसे की रोहित शर्मा, विराट कोहली यांना विश्रांती देणे, तरुण खेळाडूंना संधी देणे आणि हार्दिक पांड्या याच्याकडे संघाची सूत्रे सोपवणे अशा अनेक पर्यायांचा अवलंब करण्यात आला. मात्र संघाच्या कामगिरीत काही सुधारणा दिसली नाही.
टी-२० विश्वचषकाचे स्वप्न भंगल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल झाला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने कागारूंना २-१ने पराभूत करून जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात धडक मारली. कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेतही भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतीय संघाला २-१ने पराभूत केले. आयपीएल २०२३ संपल्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला. मात्र यातही ऑस्ट्रेलियाने भारताला २०९ धावांनी पराभूत केले.