जगाला हिटलरची गरज म्हणणाऱ्या पाक पत्रकाराची हकालपट्टी

जगाला हिटलरची गरज म्हणणाऱ्या पाक पत्रकाराची हकालपट्टी

ज्यु धर्मियांच्या अंधद्वेषात हिटलरचे स्मरण

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा संघर्षाला तोंड फुटले असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरु झाले आहेत. सोमवारी हमासने इस्रायलच्या दिशेने १०० क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्याला इस्रायलकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यामध्ये २० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

इस्रायलच्या या कृतीचा विरोध करताना काहींनी ज्यु धर्माच्या द्वेषाचा देखील कळस गठलेला पहायला मिळाला आहे. सीएनएनया वृत्तवाहिनीच्या एका पाकिस्तानी पत्रकार आदिल राजाने ट्वीटरवरून चक्क हिटलरच्या नृशंस कृत्यांचे समर्थन केले होते. त्यानंर सीएनएनने त्याला हाकलून दिले आहे.

हे ही वाचा:

‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?

प्लाझ्मा थेरेपी आता बंद, कारण काय?

मुंबईत अजून २४ तास पावसाची शक्यता

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची झापडं मुंबई-बारामती पुरती

आदिल राजा हा माणूस २०१४ पासून सीएनएनसाठी लिहीत होता आणि सप्टेंबर २०२० मध्ये त्याने शेवटचा लेख लिहीला होता.

नुकतंच पाकिस्तानात राहणाऱ्या या पत्रकारने आज जगाला हिटलरची आवश्यकता आहे असे ट्वीट केले होते. मात्र हिटलरचे समर्थन करण्याची ही काही त्याची पहिलीच वेळ नाही. २०१४ मध्ये देखील त्याने हिटलरच्या समर्थनार्थ ट्वीट केले होते. त्यावेळेला त्याने लिहीले होते की,

मी जर्मनांना पाठिंबा देतो कारण- हिटलर हा जर्मन होता आणि त्याने ज्युंसोबत जे केले ते योग्य होते. हेल हिटलर

असाच प्रकारचे ट्वीट त्याने १६ मे रोजी देखील केलेल्या ट्वीटमध्ये त्याने म्हटले होते की,

आज जगाला हिटलरची गरज आहे.

या घटनेनंतर सीएनएनने देखील कडक पावले उचलली आहेत. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की,

एक मुक्त पत्रकार म्हणून इस्लामाबादमध्ये घडणाऱ्या घटनांबाबत वृत्तांसाठी त्याची मदत होत होती. परंतु सध्याच्या घटना लक्षात घेता तो आता सीएनएनसोबत कुठल्याही प्रकारे काम करणार नाही.

हमास डागलेल्या क्षेपणास्त्रांना इस्रायल स्वसंरक्षणार्थ चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर जगभरातील कट्टरतावादी मुस्लिम राष्ट्रांकडून इस्रायलला विरोध केला जाऊ लागला होताच. मात्र आता एका विशिष्ट धर्माला विरोध करताना मुस्लिम कट्टरतावाद्यांनी किती नीच पातळी गाठली आहे, हे समोर आले आहेच. लाखो ज्युंची अमानुष कत्तल करणाऱ्या हिटलरचे समर्थन करून कट्टरतावाद्यांनी आपल्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले आहे.

Exit mobile version