‘राम मंदिरासाठी सत्ता गमवावी लागली तरी काही हरकत नाही…’

मुख्यमंत्री योग्य आदित्यनाथ यांचे विधान

‘राम मंदिरासाठी सत्ता गमवावी लागली तरी काही हरकत नाही…’

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (२१ मार्च) अयोध्येत दाखल होत रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित करताना मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले, माझ्या तीन पिढ्या श्री राम जन्मभूमी चळवळीसाठी समर्पित आहेत, आम्ही सत्तेसाठी आलो नाही, जरी मला राम मंदिरासाठी सत्ता गमवावी लागली तरी काही अडचण नाही. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रभू भगवान रामाची पूजा केली. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा सुमारे ५ तास चालला, ज्यामध्ये त्यांनी आढावा बैठक आणि जिल्ह्याच्या विकासकामांशी संबंधित बैठक घेतली. रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हनुमान गढीलालाही भेट दिली.

मुख्यमंत्री योगी म्हणाले की, जेव्हा आम्ही २०१७ मध्ये अयोध्येत दीपोत्सवाचे आयोजन पुढे नेले होते, तेव्हा आमच्या मनात एकच गोष्ट होती की अयोध्येला त्याची ओळख मिळावी, अयोध्येला तिचा योग्य तो आदर मिळावा. आता तुम्ही पाहत असाल की दिवाळीच्या एक दिवस आधी, अयोध्येत दीपोत्सव हा एक उत्सव बनला आहे.

हे ही वाचा : 

औषधी गुणधर्मांनी युक्त ‘जव’… आहारात आणि उपचारातही!

गेल्या वर्षी अमेरिकेतून २९७ प्राचीन वस्तू भारतात आणल्या…

उरी, पुलवामा हल्ल्याचा बदला घेऊन पंतप्रधान मोदींनी भारताला इस्रायल, अमेरिकेच्या यादीत आणले

आयपीएलचे नऊ दिग्गज खेळाडू, जे आजही मैदान गाजवतायत!

ते पुढे म्हणाले, माझ्या तीन पिढ्या राम मंदिर चळवळीला समर्पित आहेत, मला कोणतीही समस्या नाही, परंतु सरकारी व्यवस्था नोकरशाहीने वेढलेली आहे, त्या नोकरशाहीमध्ये एक मोठा वर्ग होता जो म्हणायचा की मुख्यमंत्रीच्या रुपात अयोध्येत गेल्याने वाद निर्माण होतो. मग आम्ही म्हणालो की जर वाद निर्माण होत असेल तर होऊ द्या, अयोध्येबद्दल काहीतरी विचार करायला हवा. मग एक गट होता जो म्हणाला की जर तुम्ही गेलात तर राम मंदिराची चर्चा होईल, म्हणून मी म्हणालो की आम्ही सत्तेसाठी आलो आहोत असे नाही, जरी आम्हाला राम मंदिरासाठी सत्ता गमवावी लागली तरी काही अडचण नाही, असे मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले.

Exit mobile version