‘तिसऱ्या लाटेत लॉकडाऊन लागला तरी उद्योग सुरू ठेवा…’ ते कसे?

‘तिसऱ्या लाटेत लॉकडाऊन लागला तरी उद्योग सुरू ठेवा…’ ते कसे?

राज्यात कोविडची दुसरी लाट ओसरून लॉकडाऊन हटवायची चिन्हे नसताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेतल्या लॉकडाऊनचे सुतोवाच केले आहे. रविवारी, ६ जून रोजी राज्यातील काही प्रमुख उद्योजकांची मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतील लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. या संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योजकांनी काय करावे याविषयीही मुख्यमंत्र्यांनी आपले मत मांडतानाच सरकार नेमके काय करणार याविषयीची ठोस आणि स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांच्या मांडणीतून दिसले नाही.

देशभर कोविडची दुसरी लाट सुरू असताना महाराष्ट्रात त्याचा त्सुनामी उसळला होता. कोविड नियोजनात सपशेल अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारने राज्यात लॉकडाऊन लावला. राज्यात अद्यापही कोरोनाशी लाट ओसरलेली नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील प्रमुख उद्योजकांची संवाद साधला. या संवादात मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची तिसरी लाट आली आणि लॉकडाऊन करावा लागला तरी उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर उत्पादनावर परिणाम होता कामा नये हे बोलून दाखवले. त्यासाठी उद्योगांनी आपल्या परिसरात कामगार व कर्मचारी यांच्यासाठी तात्पुरती निवासाची सुविधा उभाराव्यात तसेच वैद्यकीय व इतर आवश्यक सुविधा यांचे नियोजन करावे अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.

पण हे सांगताना राज्य सरकार काय ठोस पाऊले उचलणार आहे याबद्दल नेहमीप्रमाणे कोणतेही ठोस धोरण मुख्यमंत्र्यांकडून सांगितल्याचे आढळले नाही. कोविडच्या दोन लाटेत सततच्या लॉकडाऊनमुळे राज्यातील उद्योगांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या उद्योगांना पुन्हा उभारी देण्यासाठी सरकार कडून कोणतीही ठोस पाऊले उचलली जात नाहीयेत.

हे ही वाचा:

भारताची लसीकरणात इतर देशांच्या तुलनेने भरारीच!

उल्हासनगरमधील ५०० हून अधिक इमारती निकृष्ट

धान्य पुरवठ्यावरून केजरीवाल यांचे रडगाणे सुरू

पुण्यात हे असतील अनलॉकचे नियम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लावलेला लॉकडाऊन अजूनही सुरू आहे. या परिस्थितीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच कारभार ठप्प आहे. त्यातून बाहेर पडल्यावर उद्योगधंदे पूर्ववत कसे करायचे? हा प्रश्न उद्योजकांसमोर असतानाच मुख्यमंत्र्यांचे तिसऱ्या लॉकडाऊनचे संकेत देणे हे उद्योजकांच्या पोटात गोळा आणणारेच म्हणावे लागेल.

उद्योजकांनी कर्मचारी यांची निवास व्यवस्था करावी तसेच आरोग्य सुविधांची व्यवस्था करावी हे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना सांगणे सोपे असले तरी व्यवहार्यतेच्या दृष्टिकोनातून विचार करता फक्त बड्या उद्योगांना हे शक्य होणार आहे. अशा परिस्थितीत राज्यातील छोट्या उद्योजकांनी आणि उद्योगांनी काय करायचे हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढीचे केंद्र हे शहरांत अधिक होते. अशा परिस्थितीत शहरात दळणवळणाच्या साधनांच्या वापरावरही मर्यादा घालण्यात आली असून फक्त अत्यावश्यक सेवेतील या कर्मचाऱ्यांसाठी त्या सुरू ठेवण्यात आल्या तिसऱ्या लाटेत असेच निर्बंध ठेवण्यात आले. तर मग कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी पोहोचायचे कसे हा प्रश्न उपस्थित होतो.

Exit mobile version