मुख्यमंत्र्यांवर झाली तासभर शस्त्रक्रिया

मुख्यमंत्र्यांवर झाली तासभर शस्त्रक्रिया

मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी (१० नोव्हेंबर) एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. मुख्यमंत्र्यांवर आज शस्त्रक्रिया करण्यात आली असून शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. ‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी साडेसात वाजता मुख्यमंत्र्यांवरील शस्त्रक्रिया सुरू झाली होती. तासभर ही शस्त्रक्रिया सुरू होती अशी माहिती डॉक्टरांनी दिली. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुढच्या आठवड्यात उद्धव ठाकरेंची फिजिओथेरेपी सुरू होणार असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.

बुधवारी ठाकरे यांच्या कोणत्याही चाचण्या करण्यात आल्या नाहीत. मात्र गुरुवारी डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचे अहवाल गुरुवारी सायंकाळी आले. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच डॉक्टरांनी एक छोटी शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला होता. त्यानुसार गुरुवारी चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी डॉक्टरांसोबत चर्चा केली आणि या चर्चेत डॉक्टरांनी शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

आज पासून सुरु होणार आरबीआयच्या दोन नव्या योजना, ग्राहकांना मिळणार ‘हा’ फायदा

गुजरातमध्ये हस्तगत केलेल्या ३०० कोटींच्या ड्रग्सचे मुंब्रा कनेक्शन

कंगनाचे सर्व पुरस्कार परत घ्या, संजय राऊतांची मागणी

‘अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतात’

उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी गिरगाव येथील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून हा त्रास जाणवत असल्यामुळे ठाकरे यांनी भेटीगाठी टाळल्या होत्या तसेच दिवाळीनिमित्त वर्षा बंगल्यावर पाहुण्यांकडून शुभेच्छा घेणे देखील टाळले होते. 

Exit mobile version