‘लता दिदींच्या जाण्याने एका स्वर युगाचा अंत झाला’

‘लता दिदींच्या जाण्याने एका स्वर युगाचा अंत झाला’

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज ९२ व्या वर्षी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात प्राणज्योत मालवली. गेल्या अनेक दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर कोरोना आणि न्युमोनियावर उपचार सुरू होते. लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री यांनीही लता दीदींच्या निधनाने शोक व्यक्त केला आहे.

लता दिदींच्या जाण्याने एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत म्हटले की, ‘स्वर्गीय आनंद देणारी लतादीदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य- चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादीदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादीदी जगात एकमेव होत्या. त्यांच्यासारखी गानकोकीळा पुन्हा होणे नाही. अशा लतादीदी आता पुन्हा होणे नाही,’ असे अजित पवार म्हणाले.

‘देव आणि स्वर्ग आहे की नाही ते माहित नाही, परंतु लतादीदींमध्ये अनेकांनी देव पाहिला. त्यांच्या सूरांनी रसिकांना स्वर्गीय आनंदाची अनुभूती दिली. लतादीदींनी सामाजिक बांधिलकीही जाणीवपूर्वक जपली,’ असे अजित पवार म्हणाले.

लतादीदींच्या जाण्याने संगीत विश्वातला स्वर्गीय सूर आज हरपला आहे. महाराष्ट्रातला, देशातला प्रत्येक जण, प्रत्येक घर आज शोकाकूल आहे. विश्वरत्न लतादीदी महाराष्ट्रकन्या होत्या. त्यांचे नसणे कायम सलत राहील, मात्र त्यांची गाणी आपल्याला सदैव त्यांची आठवण करून देत राहतील,’ असे अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा:

स्वर कोकिळा लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

‘लतादीदींच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे’

‘लता दीदींच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती’

‘लता दीदींच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती’

लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. लता मंगेशकर यांचे पार्थिव १२.३० ते ३ पर्यंत  त्यांच्या पेडर रोडवरच्या घरात अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. लतादिदींवर मुंबईतल्या शिवाजीपार्कवर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.

Exit mobile version