गेल्या महिन्यापासून राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात तर कोरोना रुग्ण संख्येचा स्फोट झाला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८:३० वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन होणार की कठोर निर्बंध लागू होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपाकडून यापूर्वीच लॉकडाउनचा विरोध करत निर्बंध कठोर करण्याला समर्थन दर्शवण्यात आले आहे.
राज्यात लॉकडाऊनची दुसरी लाट आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे ते काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. राज्यात अनेक भागात लॉकडाऊन करण्यात आला आहे. काही ठिकाणी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. तरीही अनेक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आजच्या संवादाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
हे ही वाचा:
वाझे प्रकरणात अबू आझमींचा खळबळजनक खुलासा
भाजपा सत्तेवर आल्यानंतर सीमेवरून माणूसच काय पक्षीही घुसू देणार नाही
कोरोनाची लागण झाल्यावर सचिन रुग्णालयात दाखल
राज्यात लॉकडाऊन करावा अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र भाजपाच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लॉकडाऊनला विरोध केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोंडीत सापडले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन होणार की नाही? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक, काँग्रेस नेते संजय निरुपम आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे.
उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे या दोघांनाही कोरोनाची लागण झाली असून रश्मी ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.