अंधेरीचा राजाचे दर्शन घेण्यासाठी निघालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाटे १२.१५ वाजताच्या सुमारास विलेपार्ले येथील पश्चिम द्रूतगती मार्गाच्या उड्डाणपुलावर आपले वाहन थांबविले. पलिकडच्या रस्त्यावर एका एसयूव्हीला आग लागल्याचे लक्षात येताच आपले वाहन थांबवले.
या एसयूव्हीचा चालक बचावला होता. मग मुख्यमंत्र्यांनी त्या चालकाशी संवाद साधला आणि त्याला धीर दिला.
विलेपार्ले पोलिसांनी घटनेची ट्रॅफिक डायरी नोंदवली असून आगीचे कारण जाणून घेण्यासाठी या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, आपला ताफा थांबवणाऱ्या शिंदे यांनी घटनास्थळी जाण्यापूर्वी एसयूव्ही चालकाला मदतीचे आश्वासन दिले. “फॉर्च्युनर कार दक्षिणेकडील कॅरेजवेवर होती तेव्हा तिला आग लागली. “उत्तरेकडे जाणार्या कॅरेजवेवर आणि अंधेरी चा राजाला भेट देण्यासाठी अंधेरीच्या दिशेने निघालेल्या मुख्यमंत्र्यांनी ही आग पाहिली. अधिका-यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वाहनातून उतरून ड्रायव्हरला मदतीचे आश्वासन दिले,” पोलिसांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी त्या चालकाशी स्वतः संवाद साधला आणि त्याला काळजी करू नका असे सांगितले तसेच जीव वाचणे हे अधिक महत्त्वाचे आहे, अशा शब्दांत दिलासा दिला. शिवाय, या पेट घेतलेल्या कारजवळ न जाण्याची सूचनाही केली.
Dutiful CM Eknath Shinde stops his convoy at highway, helps man whose car caught fire pic.twitter.com/XpeUxpRfuz
— Sheetal Chopra 🇮🇳 (@SheetalPronamo) September 13, 2022
शॉर्ट सर्किटमुळे एसयूव्हीला आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. मध्यरात्रीनंतर ही घटना घडल्याने वाहतूक कोंडी झाली नाही. अर्ध्या तासात आग आटोक्यात आणण्यात आली आणि नंतर वाहन घटनास्थळावरून हलवण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा नेहमीच गरजूंना मदत करतात. मागे बिहारला एक कुटुंब आगीच्या भक्ष्यस्थानी पडले तेव्हा त्यांना आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी चार्टर विमानांची सोय केली. एका भाषणात त्यांनी असाच एक प्रसंग सांगितला होता. लिलावती हॉस्पिटलमध्ये एकाला उपचाराची गरज असताना मुख्यमंत्र्यांनी आपले विमान पाच मिनिटे थांबवले आणि प्रथम ती मदत मिळेल याची तजवीज करून मग विमानातून ते पुढील प्रवासाला गेले. अडीअडचणीत मदतीला गेलो नाही तर मग उपयोग काय असे मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या मदतीला धावून जाण्याच्या प्रवृत्तीबद्दल लोकांनाही त्यांचा आदर वाटतो.