पुनर्विकासाच्या मंजुरीमुळे उल्हासनगरात उल्हास

मंत्रिमंडळाने उल्हासनगरच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतला आहे

पुनर्विकासाच्या मंजुरीमुळे उल्हासनगरात उल्हास

उल्हासनगरमधील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केला. त्या धोकादायक इमारतींमध्ये राहणारे लाखो लोकांनी आता सुटकेचा निश्वास सोडला आहे

उल्हासनगर हे ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका आहे. हे शहर ठाणे जिल्ह्यात वसलेले असून तिथे लाखो लोकांचे वास्तव्य आहे. माहितीनुसार ते लोकं सिंधमधून फाळणीनंतर तेथे आले होते. बेकायदेशीर बांधकामांमुळे हे टाऊनशिप गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. लाखो लोक धोकादायक परिस्थितीत राहत असल्यामुळे मंत्रिमंडळानी एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे उल्हासनगरच्या पुनर्विकासाचा निर्णय ! “उल्हासनगरचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला आहे जेथे लाखो लोक धोकादायक परिस्थितीत राहत होते. मंत्रिमंडळाने उल्हासनगरच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतला आहे, असेही शिंदे म्हणाले.

हे ही वाचा:

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, आठ जणांना अटक

कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा, काँग्रेसला मळमळ

आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु

मेस्सीचे वर्ल्डकपमध्ये अनेक विक्रम; एकाच स्पर्धेत सर्व फेऱ्यांत गोल नोंदविणारा एकमेव खेळाडू

एकनाथ शिंदे हे शिवसेना आणि भाजप युती सरकारमध्ये ठाण्याचे पालकमंत्रीही होते. त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे उल्हासनगरचा कल्याणमधून लोकसभेचे खासदार आहेत. त्यांचा हस्ते हा निर्णय घेण्यात आला. आता लवकरच या शहरावरचे मोठे संकट टळणार आहे. या निर्णयामुळे हजारो धोकादायक बेकायदा इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे

Exit mobile version