‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मागून कोणीतरी धक्का दिला’

डॉक्टरांची माहिती

‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मागून कोणीतरी धक्का दिला’

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मागून कुणीतरी धक्का दिल्याची माहिती कोलकात्यातील एसएसकेएम रुग्णालयातील मेडिकल बुलेटिनमध्ये देण्यात आली. बॅनर्जी यांच्या डोक्यावर तीन तर, नाकावर एक असे तीन टाके मारण्यात आल्याचे रुग्णालयाचे संचालक मनिमॉय बॅनर्जी यांनी सांगितले.

‘मुख्यमंत्र्यांना मागून धक्का मारल्यामुळे त्या पडल्या. त्यांना संध्याकाळी साडेसात वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले,’ अशी माहिती बॅनर्जी यांनी दिली. मात्र हा धक्का कोणी मारला? हा धक्का चुकून लागला की जाणुनबुजून दिला?, याबाबत काहीच समजू शकले नाही. त्यामुळे यामागे काही षडयंत्र नाही ना, याची चर्चा सुरू झाली आहे. ममता बॅनर्जी यांना एनएसजीची सुरक्षा द्यावी, बंगाल पोलिसांवर आमचा विश्वास नाही, अशी मागणी होऊ लागली आहे.

हे ही वाचा:

पेट्रोल-डिझेलच्या किमती २२ महिने। स्थिर राहिल्यावर घटल्या!

‘एक राष्ट्र, एक निवडणूक घेतल्याने कार्यक्षमता वाढेल, वित्तीय स्थिरता बळकट होईल’

तीन तलाक ते राम मंदिर…

‘भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांसाठी अमेरिकेच्या भूमीचा वापर’

ममता बॅनर्जी यांना घरातच जखम झाली आहे. आजूबाजूला फिरत असताना त्या पडल्या आणि त्यांना जबर जखम झाली. तृणमूलच्या ‘एक्स’हँडलवर याबाबत माहिती दिली. तृणमूलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ममता गुरुवारी कालीघाट आवास परिसरात फेरफटका मारत होत्या. तेव्हाच त्या कोसळल्या. त्यांना लगेचच घरात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना एसएसकेएम रुग्णालयात नेण्यात आले. या जखमा गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

अपघाताची बाब समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून ममता बॅनर्जी यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही त्यांना आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. राहुल गांधी यांनीही शुभेच्छा दिल्या. पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनीही रुग्णालयात पोहोचून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रकृतीची विचारणा केली. तेव्हा त्यांनी परिस्थिती नियंत्रणात असून ममता बॅनर्जी यांना चांगले उपचार मिळत असल्याचे सांगितले.

Exit mobile version