कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येच्या घटनेवर निषेध सुरूच आहे. या प्रकरणावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि टीएमसीवर भाजप हल्लाबोल करत आहे. दरम्यान, भाजप खासदार ज्योतिर्मय सिंह महतो यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अटकेची मागणी केली आहे.
वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, पश्चिम बंगालच्या पुरुलिया लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार ज्योतिर्मय सिंह महतो यांनी ईडीच्या संचालकांना पत्र लिहिले आहे. पत्रामध्ये त्यांनी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील बलात्कार-हत्येच्या घटनेची आणि आरोग्य घोटाळ्यातील संदीप घोष यांच्या सहभागाची सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे. यासोबतच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अटक करण्याची मागणी देखील त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
हे ही वाचा :
अमित शहांसह भाजपाचे प्रमुख नेते लालबागच्या राजाचरणी
शरद पवार लालबागच्या राजाच्या चरणी लीन
समाजवादी पक्षाच्या नेत्याकडून सहाय्यक महिलेचाच बलात्कार !
सोनसाखळी चोरट्यांना प्रतिकार करणाऱ्या भाजपा नेत्याची गोळ्या झाडून हत्या
भाजप खासदार ज्योतिर्मय सिंह महतो यांनी ट्वीटरवर एक पोस्ट लिहित म्हणाले की, मी अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक आर.जी. यांना पत्र लिहिले आहे. मेडिकल कॉलेज आणि संदीप घोष यांची आरोग्य घोटाळ्याची सखोल चौकशी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अटक करण्याची विनंती केली आहे. पश्चिम बंगालच्या आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि सत्तेचा दुरुपयोग झाल्याचे पुराव्यावरून स्पष्ट होते. अशा परिस्थितीत जनतेला न्याय मिळाला पाहिजे, असे खासदार ज्योतिर्मय सिंह यांनी म्हटले.