मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी ममता बॅनर्जींकडे मागितला न्याय

कोलकाता बलात्कार, हत्या प्रकरणाविरोधात काढला मोर्चा

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी ममता बॅनर्जींकडे मागितला न्याय

कोलकात्यात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि तिच्या हत्येमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रस्त्यावर उतरून त्या महिलेला न्याय मिळावा अशी मागणी केली. त्यामुळे देशभरात चर्चा रंगली की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडेच न्यायाची मागणी का केली?

कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारवर ताशेरे ओढताना राज्यात कोणताही कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही, अशी टिप्पणी केली. त्याआधी, कोलकात्यातील या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी हा मोर्चा काढला. पण त्या नेमका न्याय कुणाकडे मागत आहेत, असा प्रश्न मात्र लोक विचारू लागले आहेत.

या मोर्चात ममतांच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारही सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी ममता बॅनर्जी करत होत्या. यावेळी ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि कम्युनिस्ट पार्टी यांच्यावर रुग्णालयावरील हल्ल्याचे आरोप केले. याआधी, ममतांनी रविवारपर्यंत सीबीआयने या प्रकरणाचा छडा लावावा अशी मागणी केली होती.

हे ही वाचा:

फेसबुकवर नाही तर फेस टू फेस काम करणारे सरकार

मुख्‍यमंत्री पदावरुन उबाठाचे तारे जमी पर

कलम ३७० रद्दनंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच होणार विधानसभा निवडणुका

‘बंगालमधील कायदा, सुव्यवस्था यंत्रणा पूर्णपणे ढेपाळली आहे’

९ ऑगस्टला ही बलात्काराची घृणास्पद घटना घडली होती. त्यानंतर त्या तरुणीची हत्याही करण्यात आली. यासंदर्भात संजय रॉय याला अटक करण्यात आली आहे. रॉय याने अनेक महिलांवर असे अत्याचार केलेले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे स्पष्ट होत होते की, हा रॉय नावाचा व्यक्ती पहाटे चार वाजता रुग्णालयात दाखल होत होता. त्याने जे ब्लू टूथ डिव्हाइस होते, ते त्याच घटनास्थळी सापडले.

त्या तरुणीच्या अंगावर प्राणघातक जखमा होत्या, तिने मृत्यूपूर्वी झुंज दिली होती, हे दिसत होते. तिच्या अंगावर रक्ताचे डाग दिसत होते. तिचे हाड मोडल्याचेही स्पष्ट झाले होते.

 

Exit mobile version