मुख्यमंत्र्यांनी दिलेली लसीकरणाची माहिती ‘अर्धवट’

मुख्यमंत्र्यांनी दिलेली लसीकरणाची माहिती ‘अर्धवट’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री ८:३० वाजता त्यांच्या शैलीप्रमाणे फेसबुक लाईव्हद्वारे राज्याला संबोधित केले. यावेळी महाराष्ट्रातील वाढत्या कोविड-१९ केसेस लक्षात घेता, ते लॉकडाऊनची घोषणा करतील अशी शक्यता अनेकांना वाटत होती. परंतु या भाषणातून त्यांनी केवळ आजचं मरण उद्यावर ढकलल्याचं पाहायला मिळत आहे. लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकाला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. परंतु ही माहिती निव्वळ अर्धसत्य असल्याचे समोर आले आहे.

आपण लसीकरण अधीक वाढवू शकतो. तेवढी आपली क्षमता आहे. पण केंद्राने आपल्याला अधिक लस पुरवली पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले. पण या आधी केंद्राकडून पाठवलेला लसींचा साठा गोदामात पडून असतो आणि महाराष्ट्र सरकार ते वापरत नाही, या विरोधकांच्या आरोपांबद्दलही मुख्यमंत्र्यांनी काहीच उत्तर दिले नाही.

हे ही वाचा:

उपाय सांगा, लस द्या, डॉक्टर द्या- मुख्यमंत्री

माझ्या पतीच्या मृत्यूस सरकारी अधिकारीच जबाबदार

भारताने केला म्यानमारमधील हिंसाचाराचा निषेध

एलडीएफने भगवान अय्यपांच्या भक्तांचं स्वागत पायघड्यांऐवजी लाठीने केले

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ३ एप्रिलला महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे तीन लाख नागरिकांना लस देण्यात आली. परंतु लोकसंख्येच्या मानाने तुलना केली तर महाराष्ट्र देशात अनेक राज्यांच्या मागे आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकड्यांनुसार, त्रिपुरामध्ये १४.६४%, जम्मू-काश्मीरमध्ये १३.६३% गुजरातमध्ये ७.५६%, गोव्यात ६%, हिमाचल प्रदेशमध्ये ५.७९% जनतेला लस देण्यात आली आहे. महाराष्ट्र मात्र या सर्व राज्यांच्या मागे असून महाराष्ट्रात हेच प्रमाण केवळ ४.२७% आहे.

Exit mobile version