24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषमी आता डॉक्टर झालेलो नाही, याआधीही छोटी-मोठी ऑपरेशन केलीत!

मी आता डॉक्टर झालेलो नाही, याआधीही छोटी-मोठी ऑपरेशन केलीत!

सामाजिक, कोरोना काळातील कामाची घेतली दखल

Google News Follow

Related

मी आता डॉक्टर झालेलो नाही. तर याआधीही छोटी-मोठी ऑपरेशन केलेली आहे, असा चिमटा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून डीलीट ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. डीलिट हि पदवी मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता यापुढे डॉक्टर एकनाथ शिंदे म्हणून ओळखले जाणार आहेत.

सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल त्यांना ही मानद डीलीट पदवी प्रदान करण्यात येत असल्याचे डीवाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री एनाथ शिंदे यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक डीलिट पदवी देऊन करण्यात आले आहे.

नेरुळ येथील डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या १७ वा दीक्षांत समारंभ आज झाला. यावेळी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी आधीच डॉक्टर झालेलो आहे. छोटी-मोठी मी ऑपरेशन करत असतो. पण, मी या समाजामध्ये इतके वर्ष काम करत आहे. या कामाच्या माध्यमातून किंवा जगाच्या विद्यापीठाच्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळालेआहेत. मी मुख्यमंत्री असलो तरी आजही कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. आरोप करणाऱ्यांना मी उत्तर देत नसतो. त्यांना कामातून मी उत्तर देतो असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला. विनम्रता माझ्यासाठी महत्वाचे आहे. प्रत्येक माणसाने आयुष्यात कितीही चढ-उतार आले तरी विनम्र असावे. मी ही डी.लीट पदवी महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करतो, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

जनतेने प्रेम दिल्यामुळे मी आज मुख्यमंत्री आहे. अनेक संकट आली मात्र मी घाबरलो नाही. त्याचा सामना करत इथपर्यंत पोहचलो आहे. श्रीमंतांच्या यादीत माझे नाव येणार नाही. मात्र, माणुसकीच्या यादीत माझे नाव नक्की येईल अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

केरळमधील महापूर असो महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात अडकल्यावर केलेले मदतकार्य, महाडमधील महापुराच्यावेळी केलेले मदतकार्य त्यानंतर कोरोना काळात रेमडेसीवीर इंजेक्शनतसेच इतर औषधे मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप प्रयत्न केले होते. कोणतीही विश्रांती न घेता वैद्यकीय सोयी सुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता, रुग्णालयातील बेडस, रुग्णवाहिका वेळेत मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री सतत धडपड करत होते. या काळात लोकांचे मनोबल वाढवण्याचे देखील त्यांनी मोलाचे काम केले. या सगळ्या कामाची दाखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना डिलीट पदवी प्रदान करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

पत्रकारांना आता एसटीमधून जावे लागणार ‘उडत उडत’

टोइंग करताना पोलिसालाच पोलिसांचे बनावट ओळखपत्र दाखवले; मग सापडले जाळ्यात

पत्रकारांना आता एसटीमधून जावे लागणार ‘उडत उडत’

उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना काढले महाविकास आघाडीतून ‘बाहेर’

बालआणि प्रौढ रूग्णांच्या पद्धतशीर थेरपीची गरज

‘विद्यापीठाने वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर आपले मानाचे स्थान निर्माण केले आहे ही आनंदाची बाब आहे. येथील विद्यार्थी जगातील कोणत्याही देशात जाऊन मानवाला निरोगी ठेवण्याचे काम करतील. आज बालरुग्ण आणि प्रौढ रूग्णांच्या पद्धतशीर थेरपीची नितांत गरज आहे, हे लक्षात घेऊन डी.वाय. पाटील हॉस्पिटलमधील नवीन कॅथ लॅबमध्ये आधुनिक सुविधांसह वैद्यकीय – विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर काम करण्याची क्षमता निर्माण केली आहे, ही कौतुकास्पद गोष्ट आहे असे राज्यपाल रमेश बैस यावेळी बोलतांना म्हणाले

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा