एमएमआरडीएच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या ठाणे कळवा खाडी पुलाचे लोकार्पण सोहळा रविवारी संध्याकाळी होणार होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, राजन विचारे एकाच मंचावर येणार होते. पण या सोहळ्याच्या आधीच ठाणे कळवा खाडी पुलाच्या ककामाच्या श्रेयवादाची लढाई अनुभवायला मिळाली. शिंदे आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केली होती. त्यासंदर्भात बोलताना आव्हाड म्हणाले श्रेय घ्यायचे नाही मात्र लोकांना माहीत आहे काम कुणी केलंय अस म्हणत बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. आव्हाड यांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले, कौन किसके शादी मे जा रहा है, हे लोकांना माहिती आहे. कोणी वेगळं नाही तर या राज्याचे मुख्यमंत्री पुलाचं उद्धाटन करणार आहे असे स्पष्ट केलं.
आव्हाड यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, पुलाचं उद्धाटन करणार आहे. यासाठी सर्व खर्च महापालिकेने केला आहे. त्यांच्या वैयक्तिक खर्चातून हा प्रकल्प झाला नाही. प्रयत्न तर सर्वच करतात, आमदार, खासदार, महापौर करतात, त्यामुळे सगळ्यांच्याच प्रयत्नातून प्रकल्प होत असतात. पण प्रकल्प करण्याची दानत आणि इच्छाशक्ती आमच्याकडे आहे, त्यामुळे ठाण्यात अनेक प्रकल्प आम्ही सुरु केले आहे, आणि आम्ही कधी दुजाभाव केला नाही. या मतदार संघात कोणाचा आमदार आहे, त्या मतदार संघात कोणाचा आहे असं करून केलं नाही. म्हणून कोट्यवधी रुपयांची काम ठाणे महापालिका हद्दीत केली आहेत. त्यामुळे लोकांना माहित आहे की, कौन किसके शादी मे जा रहा है वो.. अशा शब्दात प्रत्युत्तर दिले.
हे ही वाचा:
सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे शिंदे गटात
गुजरातमध्ये काँग्रेसच्या १५ दिवसांत २५ रॅली
बाबा रामदेव यांना धक्का; पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी
मुंबईसह ठाणे पोलीस दलात मोठा फेरबदल
ठाणे-कळवा खाडीवरील पुलाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ब्रिटिशकालीन पूल जुना झाल्यामुळे नवीन पूल बांधण्याची गरज भासली. येत्या १ डिसेंबरपर्यंत नवीन पुलाचे काम मार्गी लागेल. या मार्गिकेमुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडी समि होण्यास मदत होईल. सार्वजनिक वाहतूक व्हनगळी झाली तर खासगी वाहतुकीला आळा बसून लोक सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब करतील. प्रकल्पाचा लोकांना तोटा नको. खासदार, आमदार यांनी केलेल्या सूचनांचा विचार करा अशा सूचनाही मुख्यमंत्री यांनी यावेळी दिल्या.