गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरु असलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात विविध ठिकाणी शेताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातचे पीक गेल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करा, असे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केली. शेतकऱ्यांना दिलासा देतांना मुख्यमंत्री म्हणाले, युद्ध पातळीवर पंचनामे सुरू झालेले आहेत. जिथे जिथे नुकसान झालं आहे तेथे राज्यातील पालकमंत्री , जिल्हाधिकारी यांना यंत्रणा घेऊन स्पॉट व्हिजिट करण्यास तसेच प्रत्यक्ष नुकसान किती झाले याची खातरजमा करण्यासाठी सांगितले आहे.
पंचनामे झाल्यानंतर नुकसान भरपाई देण्यात येईल. अवकाळी आणि गारपिटीच्या नुकसानामुळे शेतकरी अडचणीत आहे यापूर्वी देखील आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेले नाही. एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत शेतकऱ्यांना सरकारने केली होती. सतत पडणारा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीवरून विरोधकांची सातत्याने टीका केली जात आहे.
राज्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे आणि सरकार अयोध्येला गेले अशी टिप्पणी करण्यात येत आहे. विरोधकांनी टीका करण्याची ही काही पहिली वेळ नाही. पावसाळ्यातही झालेल्या नुकसानीच्यावेळी देखील अशीच टीका करण्यात आली होती. त्यावेळी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते. आताही विरोधक तीच री ओढत आहेत. मी आयोध्यातूनच अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करा, असे आदेश दिले आहेत. तर काही ठिकाणी कलेक्टर स्वतः गेलेले आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालं आहे, त्याची भरपाई केली जाईल असे स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे तोंड गप्प केले आहे.
बाधित शेतकऱ्यांन तात्काळ मदत देणार
अमरावती, अकोला बुलढाणा आणि वाशिमध्ये २४२ गावे अवकाळी पावसाने बाधित आहेत. एकूण ७४०० हेक्टर नुकसान झालं आहे. ७५९६ एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे. याचे पंचनामे सुरू झाले आहेत. बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ मदत दिली जाईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अमरावती दौऱ्यात दिले आहेत. तीन वेळा अमरावती विभागात अशी आपत्ती आली आहे. यापूर्वी आलेल्या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. त्याची मदत लवकर देण्यात येईल अशी खात्रीही फडणवीस यांनी दिली.
हे ही वाचा:
…तर अजित पवारांची गणना अंधभक्तांत होईल!
लिट्टेला सक्रिय करण्याचा कट , एनआयएची छापेमारी, मोठ्या प्रमाणावर रोकड ,ड्रग्ज जप्त
शरद पवारांनी केली विचारवंत, पुरोगाम्यांची कोंडी
कर्नाटक स्पोर्टिंगने जिंकली पद्माकर तालीम शिल्ड
शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस लवकरच निर्णय घेतील, असे अब्दुल सत्तार म्हणाले.
राज्यात ३४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे राज्यात ३४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे. कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी नाशिकमध्ये प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. कृषी आयुक्तांनी स्तन, मालेगावमध्ये जाऊन पाहणी केली. प्रत्यक्ष पंचनामे झाल्यानंतर आकडेवारी समोर येईल. लवकरच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे कृषी आयुक्तांनी सांगितले.