33 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरविशेष'वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे'

‘वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे’

इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले मत

Google News Follow

Related

१०८व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिषदेचे महत्त्व विषद केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे यंदाचे हे १०८वे वर्ष आहे. मुख्यमंत्री त्यावेळी म्हणाले की, वैज्ञानिकांना, संशोधकांना प्रोत्साहन देण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. त्यांना सर्वप्रकारच्या सोयीसुविधा महाराष्ट्राने नेहमीच पुरविल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून या परिषदेचे आयोजन महाराष्ट्रात होत आहे, याचा आम्हाला आनंद आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी योगदान दिले, विवेकपूर्ण विचारांतून जागृती निर्माण केली. इंडियन सायन्स काँग्रेसची संकल्पना सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट विथ वूमेन एम्पॉवरमेंट ही आहे. सावित्रीबाई फुले जयंतीही आहे. त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांएवढेच योगदान देत आहेत. अंतरिक्ष, विज्ञान, भौतिकी, गणित ,इंजीनियरिंग, कृषिविज्ञान क्षेत्रात भारतीय महिला वैज्ञानिकही योगदान देत आहेत. या वैज्ञानिक महिलांचे मी स्मरण करतो. त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी एक आदर्श आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आता देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला आहे. वैज्ञानिक आणि संशोधनासाठी सर्व सोयीसुविधा महाराष्ट्र देत आला आहे. संशोधन आणि विकासासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा पुरविण्य़ासाठी महाराष्ट्र कटिबद्ध आहे. इंडियन सायन्स काँग्रेसचे हे आयोजन शिक्षक, विद्यार्थी, संशोधकांसाठी नक्कीच एक सुसंधी आहे, असे मला वाटते. प्राइड ऑफ इँडिया हे प्रदर्शन या परिषदेचे महत्त्वपूर्ण अंग आहे. सायन्सच्या क्षेत्रात कशी प्रगती सुरू आहे, त्याचे दर्शन यानिमित्ताने होणार आहे. बालविज्ञान काँग्रेसचे आयोजनही यानिमित्ताने होत आहे, हादेखील आनंदाचा क्षण आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. या सायन्स काँग्रेसच्या माध्यमातून या मुलांना प्रोत्साहन मिळेल.

हे ही वाचा:

छत्रपतींच्या वारसांकडून जनतेचा अपेक्षाभंग

‘ओएलएक्स’ वरून जुन्या वस्तू विकत घेण्याच्या बहाण्याने लुटत होते चौघे

राहुल गांधी नोटाबंदीविरोधातील मोहिमेबद्दल माफी मागणार का?

याचिकाजीवींना सणसणीत थप्पड!

शेतकरी आणि आदिवासी यांच्या कल्याणाचा विषयही या काँग्रेसमध्ये समाविष्ट आहे. कृषितंत्रज्ञान हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आधुनिक तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांच्या जीवनात बदल केले जात आहेत. आदिवासींना मुख्य धारेत आणण्यासाठी हा प्रयत्न स्तुत्य आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, नरेंद्र मोदींसारखा दूरदर्शी नेता आम्हाला मिळाला आहे. त्यांनी विज्ञानाचा उपयोग देशहितासाठी कसा करता येईल, यासाठी त्यांनी पावले टाकली आहेत. भारताने औषधनिर्मीती, सुरक्षा क्षेत्र, कृषि, हवामान, अंतरिक्ष, परिवहन, पूर्वानुमान क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला जाते. देशाला त्यांनी प्रगतीची नवी वाट दाखविली आहे. अर्थव्यवस्थेलाही मजबूत केले आहे. यासाठी जी-२० ची अध्यक्षता आम्हाला मिळाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा