‘जिव्हाळ्याच्या मुद्द्यांना एकत्रित जोडणारा चित्रपट’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बालभारती चित्रपटाचे कौतुक केले आहे

‘जिव्हाळ्याच्या मुद्द्यांना एकत्रित जोडणारा चित्रपट’

‘बालभारती’ या मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मराठी शाळांचा मुद्दा उपस्थित करणारी या चित्रपटाची कथा असल्याने सध्या हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. सगळे या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. आता तर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या आगामी मराठी चित्रपटाचं कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. ट्रेलर पाहताच त्यांनी चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले आहे. तसेच त्यांनी या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ शिंदे म्हणाले, ‘बालभारती’ हा चित्रपट मराठी संस्कृती, भाषा आणि शिक्षण या आपल्यासाठी जिव्हाळ्याच्या असणाऱ्या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडतो. इतकंच नाही तर, पालकांची आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दलची कळकळ या चित्रपटात अगदी गमतीशीर पद्धतीने मांडली गेली आहे. हा चित्रपट जिव्हाळ्याच्या मुद्द्यांना एकत्रित जोडणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : 

आपले तुकडे करण्यात येतील, असे पत्र दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाने पोलिसांना दिले होते!

लोकांची सेवा करतोय तोपर्यंत सरकार टिकेल

दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? सीबीआय तपासात झाले उघड

‘ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला, त्यांना आदित्य भेटणार’

दरम्यान, बालभारती या चित्रपटाची कथा आपल्या मुलाच्या भविष्याबद्दल चिंतीत असणाऱ्या पालकांची आहे. पालकांमध्ये घरातील मुलाच्या शिक्षणाच्या संदर्भात मतांतरे झाल्याचे पाहायला मिळते. पण, या चित्रपटाच्या कथेत अभिजित खांडकेकरने साकारलेले पात्र मुलांमध्ये मोठ्या प्रमाणवर आत्मविश्वास निर्माण करते. चुकांमधून काय आणि कसं शिकायचं याच ज्ञान मुलांना यातून मिळतं, अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिजीत खांडकेकर, अभिनेत्री नंदिता पाटकर यासह अनेक कलाकार आहेत.

Exit mobile version