जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबियांबद्द सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिंगरोबा मंदिराच्या मागे असलेल्या दरीत पहाटे चार वाजता खासगी बस कोसळून झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला . पुण्यातील जयंतीचा कार्यक्रम आटोपून येत असताना प्रवाशांवर काळाने घाला घातला. या प्रवाशांमध्ये गोरेगावाच्या बाजीप्रभू ढोलताशा पथकाचे कार्यकर्तेही होते. या बसमधील १६-१७ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी हा अपघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर लागलीच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले. ही बस पुण्याहून मुंबईकडे निघाली होती. पहाटेच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने बस दरीत कोसळली. तातडीने बचाव कार्य हाती घेऊन स्थानिकांच्या मदतीने काही प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. घटना होऊन सहा तास झाले तरी बचाव कार्य सुरु आहे.
अपघातग्रस्तांवर शासकीय खर्चातून उपचार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सध्या १८ प्रवाशांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर, १० प्रवाशांना खोपोली आणि एका प्रवाशाला खासगी जकोटिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत २९ प्रवाशी जखमी झाले आहेत. यात २४ पुरुषांचा समावेश आहेत. ही अतिशय दुर्देवी घटना आहे. जे प्रवासी मृत्यूमुखी पडलेले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना शासन मदत करेल. तसेच जे लोक जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. याशिवाय ही बस कोसळण्यामागचं नेमकं कारण काय आहे, याची देखील चौकशी करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं.
हे ही वाचा:
सावरकरांबद्दल काँग्रेसकडून पुन्हा अभद्र टिप्पणी, उद्धव ठाकरे काय करणार?
मागून आलेल्या बसने धडक दिल्याने पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू
उधमपूरमध्ये पूल कोसळून ८० पेक्षा जास्त जखमी
अरविंद केजरीवाल यांना सीबीआयचे बोलावणे
एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे जखमी :-
आशिष विजय गुरव (१९) दहिसर मुंबई., यश अनंत सकपाळ (१७), गोरेगाव, मुंबई., जयेश तुकाराम नरळकर,(२४), कांदिवली, मुंबई, वृषभ रवींद्र कोरपे, (१४), गोरेगाव, मुंबई. , रुचिका सुनील डुमणे, (१७) वर्षे, गोरेगाव, मुंबई.,आशिष विजय गुरव (१९) दहिसर, मुंबई, ओंकार जितेंद्र पवार, (२५)खोपोली, रायगड. संकेत चौधरी, (४०),गोरेगाव, मुंबई. रोशन शेलार, (३५), मुंबई, विशाल अशोक विश्वकर्मा, (२३) गोरेगाव, मुंबई, निखिल संजय पारकर, (१८) मुंबई.,युसुफ मुनीर खान, (१३), मुंबई, कोमल बाळकृष्ण चिले,(१५) सांताक्रुज, मुंबई, अभिजीत दत्तात्रेय जोशी (२०), गोरेगाव मुंबई., मोहक दिलीप सालप, (१८) मुंबई., दिपक विश्वकर्मा, (२०) गोरेगाव, मुंबई,सुरेश बाळाराम अरोमुक्कंम, (!८), गोरेगाव,मुंबई.
खोपोली नगरपालिका हॉस्पिटल मधील जखमी
नम्रत रघुनाथ गावनुक, १८ , गोरेगाव, मुंबई., चंद्रकांत महादेव गुडेकर, (२९), गोरेगाव, मुंबई, तुषार चंद्रकांत गावडे, (२२), गोरेगाव, मुंबई, हर्ष अर्जुन फाळके, (१९), विरार., महेश हिरामण म्हात्रे, (२०), गोरेगाव, मुंबई, , लवकुश रणजीत कुमार प्रजापति, (१६), गोरेगाव, मुंबई, शुभम सुभाष गुडेकर (२२) गोरेगाव, मुंबई ,ओम मनीष कदम गोरेगाव, मुंबई. मुसेफ मोईन खान,(२१), गोरेगाव, मुंबई
खाजगी रुग्णालय जाकोटिया रुग्णालय खोपोली जखमी :- सनी ओमप्रकाश राघव, (२१), खोपोली,रायगड.
खालापूर रुग्णालयात मयत :- जुई दिपक सावंत, (१८) गोरेगाव, मुबई, यश सुभाष यादव,(१८), मुंबई , स्वप्नील धुमाळ, (१८-२०), मुंबई, वीर कमलेश मांडवकर (८),गोरेगाव, वैभवी साबळे, (१६), गोरेगाव, सतीश धुमाळ, (२०), गोरेगाव, मनीष राठोड (२३) चेंबूर,