27 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरविशेषदिलासा.. कांद्याला प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान

दिलासा.. कांद्याला प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली घोषणा

Google News Follow

Related

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कांद्याला ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कांदयासह इतर शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सरकारने लायक्रात कवकर मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्यामुळे चिंतेत असलेल्या बळीराजाला दिलासा मिळणार आहे.

कांद्याच्या प्रश्नावरून विरोधक सरकारला वारंवार घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. कांदा उपदक शेतकऱ्यांना क्विंटलमागे ३०० रुपये सानुग्रह अनुदान देऊन सरकारने जोरदार उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी हा निर्णय घेतल्यानतंरही विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्याचं प्रयत्न केला. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री म्हणाले,२०१६-१७ सानुग्रह अनुदान म्हणून २०० रुपये दिले होते. १७-१८ मध्ये २०० रुपये दिले होते. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणून ३०० रुपये क्विंटल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल.

हे ही वाचा:

परदेशी आईचा मुलगा देशभक्त होऊ शकत नाही

नाटू-नाटू, द एलिफन्ट व्हिस्परर्सने रचला इतिहास, भारताला मिळाले दोन ऑस्कर

परदेशी आईचा मुलगा देशभक्त होऊ शकत नाही

विमानात सिगारेट पिणाऱ्या आणि दरवाजा उघडणाऱ्या प्रवाशाने घातला गोंधळ

मुख्यमंत्री म्हणाले , कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नदी पीक असून त्याला मिळणारा भाव हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचा भाग आहे. कांद्याची देशांतर्गत मागणी आणि उन्हाळी निर्यात इत्यादी सर्व बाबींचा विचार करून त्याचा परिणाम बाजारपेठेतील कांद्याच्या दरावर होत आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी समिती नेमली होती. या समितीने २०० रुपये आणि ३०० रुपये क्विंटल अशी  शिफारस केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा