१५ जानेवारी हा राज्याचा क्रीडा दिन तर शिवछत्रपती पुरस्काराची रक्कम वाढली

शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या वितरणप्रसंगी मुख्यमंत्र्यांची घोषणा

१५ जानेवारी हा राज्याचा क्रीडा दिन तर शिवछत्रपती पुरस्काराची रक्कम वाढली

महाराष्ट्र सरकारच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सोमवारी वितरित करण्यात आले. त्यावेळी भारताचे पहिले ऑलिम्पिक पदकवीर आणि महाराष्ट्राचे कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी हा राज्याचा क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी १९२५ आहे. त्यांनी १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक जिंकले होते. ते भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक ठरले होते. त्यांच्या स्मृत्यर्थ हा दिवस साजरा करण्याचे ठरले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही मागणी केली होती.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानात आता हिजाब व्यवस्थित न घातल्यास महिलांना उद्यानबंदी

‘इंडिया’ गटाला धक्का? ‘आप’ बिहार विधानसभा निवडणूक लढवणार

चेंबूरच्‍या शरद नारायण आचार्य उद्यानात बहरणार ‘नागरी वन’

फडणवीस यांच्यावरील खालच्या भाषेतील टीका खपवून घेणार नाही

अजित पवार यांनी पुरस्काराच्या रकमेतही वाढ करण्याची मागणी केली होती. तीही मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. त्यामुळे आता १ लाखाच्या पुरस्काराएवजी ३ लाख रुपये शिवछत्रपती पुरस्कारविजेत्याला मिळतील तर ३ लाखांचा पुरस्कार आता ५ लाख होईल. तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे आहेत पण मी या पुरस्काराच्या रकमेत वाढ केल्याची घोषणा करतो, असे मुख्यमंत्री म्हणा

Exit mobile version