…अन्यथा इंडी आघाडीतून काँग्रेसला बाहेर काढू!

मुख्यमंत्री आतीशी यांनी दिला अल्टीमेट

…अन्यथा इंडी आघाडीतून काँग्रेसला बाहेर काढू!

दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीमध्ये विरोधकांच्या इंडी आघाडीत मोठी फुट पडताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आम आदमी पार्टी इंडी आघाडीमधून काँग्रेसला बाहेर काढेल का?, असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण गेल्या काही दिवसांत काँग्रेस नेते अजय माकन आणि युवक काँग्रेसच्या नेत्यांनी आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात वक्तव्ये केली असून त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांनी आज (२६ डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेत्यांच्या या कृतीला प्रत्युत्तर दिले आहे.

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आतिशी यांनी काँग्रेसला त्यांच्या नेत्यांवर कारवाई करण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. आतिशी यांनी म्हटले, दिलेल्या वेळेत या नेत्यांवर कारवाई न झाल्यास आम आदमी पार्टी काँग्रेस पक्षाला इंडी आघाडीतून बाहेर काढण्यासाठी इतर पक्षांशी चर्चा करेल. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करत असल्याचे दिसत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

त्या पुढे म्हणाल्या, जर तसे काही नसेल आणि आगामी निवडणुकीत भाजपला विजय मिळावा असे काँग्रेसला वाटत नसेल तर अजय माकन आणि युवक काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई करावी. जर काँग्रेस पक्षाने अशा लोकांवर कारवाई केली नाही तर यापुढे आम्हाला काँग्रेस पक्षासोबत इंडी आघाडीमध्ये युती ठेवायची नाही.

हे ही वाचा : 

काँग्रेसच्या कार्यक्रमात भारताच्या नकाशातून पीओके, अक्साई चीन गायब

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची गाडी उलटून झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील दोन जवान!

ख्रिसमसच्या पूर्वसंध्‍येला बांगलादेशच्या चितगावमध्‍ये ख्रिश्चन समुदायाची १७ घरे जाळली

कल्याण:अल्पवयीन मुलीवर अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी!

काँग्रेस पक्ष आमच्यासोबत युतीमध्ये आहे आणि युतीत असूनही अशा गोष्टी बोलत आहेत. भाजपा आमच्यासोबत नसतानाही त्यांनी कधी केजरीवालांना देशद्रोही म्हटले नाही. मात्र युतीमध्ये असूनही काँग्रेसचे नेते आम आदमी पक्षावर गुन्हे दाखल करत आहेत, असे मुख्यमंत्री आतीशी म्हणाल्या.

दरम्यान, आप आणि काँग्रेसच्या वादावर भाजपाने प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, इंडी आघाडी या दुकानाचे सर्व भाडेकरू एकमेकांच्या विरोधात आहेत. मुख्यमंत्री आतिशी यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केले आहे, त्यावरून आम आदमी पार्टीने आपला पराभव स्वीकारल्याचे निश्चित दिसत आहे, असे त्रिवेदी म्हणाले.

Exit mobile version