भारतातील नागालँडमधील जंगलात एक वेगळ्या जातीचा बिबट्या आढळून आला आहे. ढगाळ रंगाचा बिबट्या (clouded leoperd) असे या बिबट्याचे नाव असून नागालँडमध्ये यापूर्वी हा बिबट्या आढळून आला नव्हता. कमी उंचीच्या सदाहरित पर्जन्यवनांमध्ये हा बिबट्या त्याचे वास्तव्य करतो मात्र, हा आता भारत-म्यानमार सीमेवर ३ हजार ७०० मीटर उंचीवर आढळून आला आहे. काही संशोधकांनी लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये या बिबट्याच्या प्रतिमा टिपल्या आहेत.
नागालँडमध्ये हा नवा बिबटा दिसल्याने आता या परिसरात आणखी या प्रजातीचे बिबटे आहेत का हा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या सुरू असलेले सर्वेक्षण हे वाईल्डलाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया आणि थनमीर गाव यांच्या संयुक्त प्रयत्नाने सुरू आहेत.
हे ही वाचा:
पाच राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमांची थोड्याचवेळात घोषणा
‘ठाकरे सरकारचे कोविड सेंटर घोटाळे दहा दिवसांत बाहेर काढणार’
आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी
… म्हणून सोनू सूदने पंजाबचे ‘स्टेट आयकॉन’पद सोडले
संशोधकांच्या पथकाने या बिबट्याचे फोटो कैद केले असून हा बिबट्या झाडावर चढण्यात तरबेज असतात. त्यांचे पाय अत्यंत शक्तिशाली असतात. ढगाळ रंगाचा बिबट्या हा बिबट्या सदॄश दिसतो पण ठिपक्यांऐवजी त्याच्या अंगावर मोठे मोठे ठिपके (ब्लॉक) असतात. याचा सर्वाधिक वावर भूतानमध्ये असून भारतात आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या राज्यांमध्ये आढळतो.