जम्मू आणि काश्मीरमधील अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे. गुहेच्या पायथ्याशी असलेल्या यात्रा तळानजीक शुक्रवार, ८ जुलै रोजी ढगफुटी झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ४० जण बेपत्ता आहेत.
अमरनाथ गुहा परिसरात काल संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही ढगफुटी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यानंतर नजीकच्या तळावर असलेले तंबू, लंगर वाहून गेले. एनडीआरएफचे (NDRF) महासंचालक अतुल करवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० जण बेपत्ता आहेत. NDRF पथकाकडून बेपत्ता यात्रेकरुंचा शोध सुरु आहे. मृतांच्या आणि बेपत्ता भाविकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
ITBP troops conduct rescue operation at lower Amarnath Cave site
Read @ANI Story | https://t.co/WgKNSMKJ6S#ITBP #Amarnath #AmarnathCloudburst pic.twitter.com/zeFjLzfzp2
— ANI Digital (@ani_digital) July 9, 2022
हे ही वाचा:
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट
‘धनुष्यबाण कुणीही हिरावून घेऊ शकत नाही’
कल्याण डोंबिवली, पुण्यातही शिवसेनेला खिंडार
‘मविआ सोडा, मोदींशी चर्चा करा’
आयटीबीपी पीआरओ (ITBP PRO) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून या परिसरात पाऊस सुरुच आहे. वाढलेला धोका पाहता तूर्तास अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. हवामान आणि परिस्थिती सामान्य राहिल्यास यात्रा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. जखमी लोकांना उपचारासाठी एअरलिफ्ट केलं जातं आहे.