नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस; शाळांना सुट्टी

आपत्ती व्यवस्थापन पथक कार्यरत

नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस; शाळांना सुट्टी

नागपुरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवार, २३ सप्टेंबर रोजी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला असून एका रात्रीत १०६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे नाग नदीला पूर आला आहे. नाग नदीच्या काठच्या घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अनेक वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने नागपुरात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. तसेच शहरात अजूनही पावसाची रिपरिप सुरूच आहे. अनेक भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला असून जिल्हा आणि महानगर प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन पथक कार्यरत आहेत. जिल्हाधिकारी आणि महानगर पालिका आयुक्तांनी शहरातील अनेक भागांची पाहणी केली असून जिल्ह्यातील सर्व शाळांना (जिल्हा आणि महानगर क्षेत्र) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

हे ही वाचा:

अजित पवारांकडून शरद पवारांच्या आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची मागणी

महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी अदानींना मिळाले १३,८८८ कोटी रुपयांचे कंत्राट !

सनातन धर्मावर टिप्पणी केल्याप्रकरणी उदयनिधी स्टॅलिनला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस !

तेलंगणा पोलिसांचा नक्षल ‘ विजय ‘

नागपुरातील मुसळधार पावसाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्वीट केलं आहे. फडणवीसांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “नागपुरात रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या चार तासांत १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती देण्यात आली. नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफचे दोन पथक बचाव कार्यात तैनात करण्यात आले आहेत.”

Exit mobile version