सिक्कीममध्ये ढगफुटी; महापुरात लष्कराचे २३ जवान बेपत्ता

प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधकार्य आणि बचावकार्य सुरू

सिक्कीममध्ये ढगफुटी; महापुरात लष्कराचे २३ जवान बेपत्ता

सिक्कीममध्ये अचानक झालेल्या ढगफुटीमुळे तीस्ता नदीला भयंकर पूर आला आहे. सर्वत्र हाहाःकार उडाला असून भारतीय लष्कराचे तब्बल २३ जवान बेपत्ता झाले आहेत. या घटनेनंतर प्रशासनाकडून या भागात युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरू आहे. सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे प्रशासानाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

सिक्कीमच्या सिंगतम भागात ढगफुटीची घटना घडली. यानंतर नदीला पूर येऊन इतक पाणी वाढलं की, चुंगथांग धरणातून पाणी सोडावं लागलं. त्यामुळे अचानक पाण्याचा स्तर १५ ते २० फूटाने वाढला. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग घटनास्थळी भेट देण्याची शक्यता आहे.

गुवाहाटीतील संरक्षण पीआरओंनी दिलेल्या माहितीनुसार, “उत्तर सिक्कीममधील लोनाक तलावाला अचानक पूर आला. याचा परिणाम लष्करावरदेखील झाला. यात २३ जवान बेपत्ता झाले आहेत. चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पाण्याची पातळी अचानक वाढली. त्यामुळे सिंगतमजवळील बारडांग येथे उभी असलेली लष्करी वाहने वाहून गेली आहेत. यात लष्कराचे २३ जवान बेपत्ता असून ४१ वाहने वाहून गेली आहेत.

हे ही वाचा:

इटलीमध्ये पर्यटकांची बस उलटून २१ ठार

दिल्लीसह उत्तर भारत हादरला!

मुंबईमधील स्विमिंग पूलमध्ये शिरली मगर

नांदेड मधील रुग्णांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होईल!

“सरकारी यंत्रणा शोधकार्य आणि बचावकार्य करत असून बेपत्ता नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अद्याप कोणतीही जीवित हानी झालेली नाही, पण सिंगताममध्ये सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आहे. काही लोक बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” अशी माहिती भाजप नेते उग्येन त्सेरिंग ग्यात्सो भुतिया यांनी दिली.

Exit mobile version