धरमशालामध्ये ढगफुटी, मालमत्तेचं मोठं नुकसान

धरमशालामध्ये ढगफुटी, मालमत्तेचं मोठं नुकसान

हिमाचल प्रदेशची हिवाळी राजधानी धरमशालामधील भागसू नाग भागात आज (१२ जुलै) सकाळी अचानक ढगफुटी झाली. ढगफुटीनंतर या भागात पुरस्थिती तयार झाली. यानंतर प्रशासनाने शहरी भागात हाय अलर्ट जारी केला आहे. पुराचं पाणी शहरातील घरांमध्ये घुसलंय. त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पुरात अनेक महागड्या गाड्या वाहून गेल्या आहेत. धरमशालाच्या भागसू नाग भागातील ढगफुटी इतकी भयानक होती, की त्यानंतर लगेचच पूर आला आहे.

पुरामुळे भागसू नाग भागातील छोटे नाले भरून होऊन वाहत आहेत. पाण्याची पातळी वाढल्यानं नाल्यांनी विक्राळ नदीचं रुप घेतलंय. या नाल्यांच्या कडेला असणारे हॉटेल आणि घरांना देखील पुराने मोठं नुकसान झालंय. एकाएकी तयार झालेल्या या परिस्थितीमुळे या ठिकाणी भीतीचं वातावरण तयार झालंय. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आलाय. या व्हिडीओत पुराचा रौद्ररुप स्पष्टपणे पाहता येतंय. यात पुराच्या पाण्यात गाड्या वाहून जातानाही दिसत आहेत.

हे ही वाचा:

महाविकास आघाडीचे मन में है अविश्वास, पुरा है अविश्वास!

‘या’ नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा द्या

एलआयसीचा आयपीओ डिसेंबर महिन्यापर्यंत?

कोरोना पाठोपाठ देशात झिकाचा अलर्ट

रविवारी (११ जुलै) रात्री उशिरापासून हिमाचल प्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला, मात्र पुराने मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. मैदानी भागात या दिवसांमध्ये प्रचंड उकाडा असल्यानं अनेक लोक या काळात धर्मशाळाच्या भागसू नाग भागात थांबतात. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गाड्या होत्या. पुराने या सर्व वाहनांचं मोठं नुकसान झालं.

Exit mobile version