भारताचा स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. स्वातंत्र्याचा हा उत्सव साजरा करण्यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. जम्मू-काश्मीरमध्ये देखील लोकांच्या उत्साहाला उधाण आलेले पाहायला मिळत आहे. यात श्रीनगरमधील लाल चौकातील प्रसिद्ध असे घंटाघर हे भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगांनी सजले आहे. एकेकाळी ज्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यासाठी आंदोलन करावे लागत होते आज त्याच ठिकाणी तिरंग्याच्या रंगांनी घंटाघर प्रकाशमान करण्यात आले आहे.
५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जम्मू-काश्मीर संदर्भात एक ऐतिहासिक निर्णय घेत कलम ३७० आणि ३५ अ रद्दबादल केले. जम्मु-काश्मीर मधील कलम ३७० हटवल्यापासून या प्रदेशात नागरिक मोकळा श्वास घेताना दिसत आहेत. ज्या श्रीनगरच्या लाल चौकात पाकिस्तानातील दहशतवादी, काश्मीर खोर्यातील फुटीरतावादी यांच्या कुरबूरी सुरू असायच्या. जिथे सर्रास पाकिस्तानचे झेंडे फडकताना दिसायचे, तिथेच आता भारताचा राष्ट्रध्वज दिमाखात फडकताना दिसत आहे. तिरंगी रंगात सजलेल्या लाल चौकातील या घंटाघराची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. काश्मीरमध्येही परिस्थिती निर्माण केल्याबद्दल मोदी सरकारचे आभार देखील मानले जात आहेत.
हे ही वाचा:
कोविडची होणार हार, लसीकरण ५० कोटी पार
…म्हणून तेजस ठाकरेंची व्हिव्हियन रिचर्ड्स सोबत तुलना! नार्वेकरांचा खुलासा
नितीन गडकरी हा ब्रिलियंट माणूस
#WATCH | Jammu and Kashmir: Clock Tower (‘Ghanta Ghar’) at Lal Chowk in Srinagar illuminated in the colours of the Tricolour last night, ahead of Independence Day. pic.twitter.com/6d2pbbX2i3
— ANI (@ANI) August 7, 2021
आजपासून तब्बल २९ वर्षांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः काश्मीर मधील लाल चौकात तिरंगा फडकवण्यासाठी आंदोलन केले होते. १९९२ साली त्यांनी लाल चौकात तिरंगा फडकवला होता. त्यामुळे मुरली मनोहर जोशी हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होत. त्यांच्या या कार्यकाळात ‘एकता यात्रा’ काढण्यात आली. त्याचे संयोजक हे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते.