कोविड-१९ विरुद्धच्या आणखी एका लसीच्या चाचणीला सुरूवात

कोविड-१९ विरुद्धच्या आणखी एका लसीच्या चाचणीला सुरूवात

सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात कोविड-१९ च्या कोवोवॅक्स लसीच्या क्लिनिकल चाचण्यांना सुरूवात झाली आहे. त्यामुळे ही लस सप्टेंबर पर्यंत उपलब्ध होण्याची चिन्हे दिसत आहेत.

आदर पुनावाला यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. त्यांनी या ट्वीट मध्ये म्हटले आहे की, “अखेरीस कोवोवॅक्सच्या क्लिनिकल चाचण्यांना सुरूवात झाली आहे. ही लस नोवावॅक्स आणि सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या भागीदारीतून निर्माण करण्यात येणार आहे. या लसीची चाचणी कोविडच्या आफ्रिका आणि युरोप आवृत्तीविरोधात उपयुक्त आहे आणि एकूण ८९ टक्के यशस्वी आहे. सप्टेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध होण्याची आशा आहे.”

हे ही वाचा:

पराभवाच्या भीतीने ममता बॅनर्जी त्रस्त, भाजपा कार्यकर्त्याला फोन करून मदतीची विनवणी

एअर इंडियाचे खासगीकरण मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा निर्धार

बीपीसीएलने नुमालीगढ तेल शुद्धीकरण कारखान्यातील विकली भागीदारी

ऑगस्ट २०२० मध्ये अमेरिकेतील नोवावॅक्स या लस उत्पादक कंपनीने, सिरम इन्स्टिट्युट सोबत त्यांच्या NVX-CoV2373 या कोविड-१९ विरुद्धच्या लसीच्या व्यावसायिक उत्पादनासाठी आणि विकासासाठी सहकार्य करणार असल्याचे घोषित केले होते. ही लस कमी अथवा मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांना उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे कळले आहे.

सिरम इन्स्टिट्युट मोठ्या प्रमाणात कोविशिल्ड लसीचे उत्पादन करत आहे. या लसीच्या सहाय्याने भारतातील लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली. त्याशिवाय ही लस सुमारे ७७ देशांना देखील निर्यात करण्यात आली.

Exit mobile version