उपनिषदांमध्येही नमूद आहे हवामान विभागाचे रहस्य

उपनिषदांमध्येही नमूद आहे हवामान विभागाचे रहस्य

देशात सद्यस्थितीत पावसाने हाहाकार माजवला आहे. दररोज हवामान विभागातर्फे या संदर्भात माहिती देऊन सतर्कतेचा इशाराही दिला जात आहे. मात्र याच हवामानशास्त्राचा उल्लेख उपनिषदांमध्येही आढळला आहे. सुमारे इसवी सन पूर्व ६५० मध्ये युनानींनी ढगांच्या बदलत्या परिस्थितीचा अंदाज केला होता. त्यानंतर इसवीसन पूर्व ३४० मध्ये अरस्तू याने त्याचा ग्रंथ ‘मीटिरॉलॉजिका’मध्ये हवामानाची व्याख्या दिली होती. चीनमध्येदेखील इसवी सन पूर्व ३०० मध्ये हवामानाच्या भविष्यासंदर्भात माहिती दिली होती. तेव्हाचे हवामानाचे अंदाज हे तेव्हाच्या वातावरणाच्या विविध परिस्थितीनुसार मांडले जात. म्हणजे उदा. सूर्यास्ताच्या वेळी लाल रंग असल्यास दुसऱ्या दिवशी वातावरण स्वच्छ असेल. मात्र हे अंदाज नेहमी खरे ठरत नसत.

 

भारताच्या हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, भारतात हवामान शास्त्राचा उल्लेख इसवी सन पूर्व ३०००मध्ये मिळतो. उपनिषदांमध्ये पूर्वानुमान आणि हवामान शास्त्र विभागाशी संबंधित अनेक तथ्ये सापडली आहेत. इसवी सन पूर्व ५०० मध्ये वराहमिहिर यांनी लिहिलेल्या बृहद्संहितेमध्येही हवेच्या प्रक्रियेचा अभ्यास केला आहे.

 

भारतात जगभरातील सर्वांत जुन्या हवामान वेधशाळाही आहेत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील कोलकात्यात १७८५मध्ये आणि १७९६मध्ये मद्रास येथे हवामान आणि जलवायूच्या अभ्यासासाठी केंद्रे स्थापन केली होती. १७८४मध्ये कोलकात्यात आणि १८०४मध्ये मुंबईतील एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली. याद्वारे भारतात हवामान शास्त्राच्या अभ्यासाला प्रोत्साहन मिळाले. कलकत्तामध्ये कॅप्टन हॅरि पिडिंगटन यांनी १८३५ते १८५५ या दरम्यान उष्णकटीबंधीय वादळाशी संबंधित ४० पानांचा ‘जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटी’ हा अहवाल प्रकाशित केला. त्यात त्यांनी वादळाचा अर्थ सांगितला. त्यानंतर १८४२मध्ये त्यांनी वादळाचे नियम सांगणारा एक अहवाल प्रकाशित केला. १९व्या शतकापर्यंत भारतात अनेक वेधशाळा उभारल्या गेल्या.

हे ही वाचा:

१५ वर्षांत भारतातील ४१.५ कोटी जनता गरिबीतून पडली बाहेर

समृद्धी महामार्गावर एअर ऍम्ब्युलन्स सेवा सुरू होणार

२५ समोसे पडले १ लाख ४० हजारांना

कार्यालयात घुसून माजी कर्मचाऱ्याने आपल्या माजी ‘बॉस’ला तलवारीने केले ठार

 

१७व्या शतकात आधुनिक तापमापक आणि वायुदाबमापकाचा शोध लागल्यानंतर आधुनिक हवामान विभाग अस्तित्वात आला. हवामानाच्या अंदाजाच्या वर्तमान युगाचा प्रारंभ १९३७ मध्ये टेलिग्राफच्या शोधानंतर झाल्याचे मानले जाते. त्यामुळे मोठ्या क्षेत्रातील हवामानाच्या अंदाजासाठी आवश्यक सूचना एकत्र करणे शक्य झाले. आता हवामान वैज्ञानिक हवामानाचा अंदाज व्यक्त करण्याकरिता आकडेवारी एकत्र करणे आणि त्यांचे गणित मांडण्यासाठी कम्प्युटरचा वापर करतात. हवामान विभाग चार प्रकारचे अंदाज व्यक्त करतात. पहिला असतो, तात्कालिक. हा अंदाज पुढील २४ तासांसाठी असतो. दुसरा अल्प काळासाठी म्हणजे पुढील दोन ते चार दिवसांसाठी असतो. तिसरा अंदाज चार ते १० दिवसांसाठी तर चौथा विस्तृत म्हणजे १० हून अधिक दिवसांसाठी असतो.

Exit mobile version