नशीब असावं तर असं! लॉटरी खरेदी केल्यावर तासाभरात क्लर्क झाला करोडपती

नशीब असावं तर असं! लॉटरी खरेदी केल्यावर तासाभरात क्लर्क झाला करोडपती

पंजाबमधील गुरुदासपूर येथे नशिबाचा अजब खेळ समोर आला आहे. येथील डेराबाबा नानकच्या कृषी विकास बँकेच्या क्लार्कचे नशीब अवघ्या एक दिवसात पालटले आहे. रुपिंदरजीत सिंग नावाच्या या क्लार्कने एक कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, त्याने निकालाच्या एका तासापूर्वीच हे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते.  

बटाला येथे राहणाऱ्या रुपिंदरजीत सिंगने शनिवारी १२ वाजता नागालँड राज्य लॉटरीची सहा रुपयांप्रमाणे २५ तिकिटे विकत घेतली होती. त्यानंतर तो कार्यालयात आला आणि नेहमीप्रमाणे काम करू लागला. त्यानंतर बरोबर एका तासाने त्याला लॉटरी एजंटचा फोन आला. त्यांनी त्याला या लॉटरीचे पहिल्या क्रमांकाचे, एक कोटी रुपयांचे बक्षीस लागल्याचे सांगितले. मात्र रुपिंदरजीत सिंगला आपण कोट्यधीश झालो आहोत, यावर सर्वांतप्रथम विश्वासच बसला नाही. त्याच्यासाठी हे सारे स्वप्नवतच होते.

हे ही वाचा:

भारतात पोहोचताच पंतप्रधानांनी घेतला दिल्लीच्या पूरस्थितीचा आढावा

टोमॅटो विकून एका महिन्यात कमावले कोटी

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना दोन वर्षांची शिक्षा

ज्ञानव्यापी मशिदीतील कार्बन डेटिंगप्रकरणी २१ जुलै रोजी निर्णय

एक कोटीची लॉटरी लागल्यानंतर सहकारी, मित्र, नातेवाइकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रुपिंदरजीतने मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी या पैशांचा उपयोग करेन आणि काही गरजूंनाही मदत करेन, असा मनोदय व्यक्त केला आहे. याआधी एप्रिल २०२२मध्येही अशाच प्रकारची घटना समोर आली होती. गुरदासपूरयेथील बटाला येथे राहणाऱ्या सुनील डोगरा याने नागालँड स्टेट लॉटरीची सहा रुपयांची काही तिकिटे खरेदी केली होती. तेव्हा त्यांनाही एक कोटीचे बक्षीस लागले होते. ज्या दिवशी त्यांनी तिकिटे खरेदी केली होती, त्याचवेळी त्यांना एक कोटीचे बक्षीस लागले होते.

Exit mobile version