सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर येण्याचा मार्ग मोकळा; नासाची टीम अंतराळात पोहोचली

नासा आणि स्पेस एक्स ची क्रू- ९ मोहीम सुरू

सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर येण्याचा मार्ग मोकळा; नासाची टीम अंतराळात पोहोचली

गेल्या काही महिन्यांपासून अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे अंतराळात अडकून पडले आहेत. त्यांना अंतराळातून पृथ्वीवर आणण्यासाठी नासाकडून प्रयत्न सुरू होते. अशातच आता त्यांना पृथ्वीवर आणण्यासाठी नासा आणि स्पेस एक्स चे क्रू- ९ (Crew-9) मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांचा पृथ्वीवर परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या मोहिमेंतर्गत, नासाचे निक हेग आणि रशियन अंतराळ संस्था रोसकॉसमॉसचे अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव, स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूलमध्ये प्रवास करत रविवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) यशस्वीरित्या पोहोचले. हेग आणि गोर्बुनोव्ह यांचे आयएसएसवर आगमन होताच सर्वांनी उत्साहात स्वागत केले.

सुनीता आणि विल्मोर हे या वर्षी जूनमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेले होते. हे दोघे ५ जून रोजी बोईंगच्या स्टारलाइनर स्पेसक्राफ्टने अंतराळात गेले होते. सुनीता आणि बुच यांचे हे स्पेसमधलं मिशन आठ दिवसांचे होते. स्टारलायनर या स्पेसक्राफ्टमधून ते अंतराळात गेले होते, ते आता या दोघांशिवाय पृथ्वीवर लँड झालं आहे. तेव्हापासून ते तिथेच राहत होते. त्यांना परत आणण्यासाठी, क्रू- ९ मिशन सुरुवातीला २६ सप्टेंबर रोजी प्रक्षेपित केले जाणार होते. मात्र, फ्लोरिडाच्या आखाती किनारपट्टीवर वादळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हवामान खूपच खराब झाले होते त्यामुळे हे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते. नंतर हे २८ सप्टेंबर रोजी लाँच करण्यात आले.

हे ही वाचा : 

इस्रायलने बेरूतमध्ये केलेल्या हल्ल्यात चार जण ठार

अखेर ६ दिवसानंतर अक्षयचा मृतदेह स्मशानात दफन, पोलिसांच्या बंदोबस्तात अंत्यसंस्कार!

मोदींना सत्तेतून हटवणार नाही, तोपर्यंत जिवंत राहीन!

एन्काऊंटर स्पेशालिस्ट जरांगे…

आता विल्यम्स आणि विल्मोर पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पृथ्वीवर परततील. अंतराळवीर अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव यांनी संध्याकाळी ७.०४ वाजता अंतराळ स्थानकात प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले. यात नासा अंतराळवीर मॅथ्यू डोमिनिक, मायकेल बॅरेट, जेनेट एप्स, डॉन पेटिट, बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स तसेच रोसकॉसमॉस कॉस्मोनॉट अलेक्झांडर ग्रेबेंकिन, ॲलेक्सी ओव्हचिनिन आणि इव्हान वॅगनर यांचा समावेश होता. दोघांनाही पाच महिन्यांच्या मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्यात आले आहे. हेग आणि गोर्बुनोव पुढील क्रू रोटेशनसह फेब्रुवारीपर्यंत स्थानकावर राहतील. हेग हे या मिशनचे कमांडर असतील.

Exit mobile version