नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक IRS समीर वानखेडे यांना जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या समितीचा निकाल समीर वानखेडे यांच्या बाजूने लागला आहे. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम नसून समीर वानखेडेंच्या वडिलांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लीम धर्माचा स्वीकार केल्याचे सिद्ध होत नाही, असे समितीने म्हटले आहे.
कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे चर्चेत आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम आहेत आणि त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर करून मागासवर्गीय कोट्यातून सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी समीर वानखेडेंना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. अखेर या समितीने दिलेला निकाल समीर वानखेडे यांच्या बाजूने लागला आहे. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम नाहीत. समीर वानखेडेंच्या वडिलांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लीम धर्माचा स्विकार केल्याचं सिद्ध होत नाही, असं समितीने स्पष्ट म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणी समीर वानखेडे यांना क्लीनचीट मिळाली आहे. तसेच समीर वानखेडेंविरोधात केलेली तक्रार सिद्ध होत नसल्याने जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने ही तक्रार फेटाळली आहे.
हे ही वाचा:
उमेश कोल्हे हत्या प्रकरणी NIA कडून दहाव्या आरोपीला अटक
एकनाथ शिंदेंचे ‘शिवसेनाभवन’ दादरमध्येच
कर्नाटकात ख्रिश्चन शाळेत मुलांच्या हातावरील राख्या काढून फेकल्या
‘मुंबई पालिकेला भ्रष्टचारमुक्त करणार’
मुंबईतील कॉर्डिलिया क्रुझवर समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीबी पथकाने छापा टाकत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर काही जणांना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळून मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.