फॉर फ्युचर इंडियाचे भाईंदरला स्वच्छता अभियान

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम

फॉर फ्युचर इंडियाचे भाईंदरला स्वच्छता अभियान

फॉर फ्युचर इंडिया या पर्यावरणवादी युवा संस्थेने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाईंदर येथील वेलंकनी समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविले. खरंतर ही संस्था गेली साडे-तीन वर्षे मिरा भाईंदर व मुंबई शहरातील समुद्रकिनारे स्वच्छ राखण्याचे कार्य अविरतपणे करत आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मॅन्ग्रोव्हस फौंडेशन, ब्लॉसम हायस्कूलच्या शिक्षक, आदेश मसाले कंपनीचे पदाधिकारी व कर्मचारी, HLA संस्था, मिरा भाईंदर स्वच्छता/आरोग्य विभाग सोबतच इतर महाविद्यालीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी जवळपास २ टन इतका प्लॅस्टिक व इतर मिश्र कचरा काढण्यात यशस्वी झाले.

यावेळी प्रामुख्यने मासे पकडण्यात वापरात येणाऱ्या जाळीचे तुकडे मोठ्या प्रमाणत होते. यामुळे जलचर प्राण्यांना मोठ्या प्रमाणत हानी पोहोचत आहे याची जाणीव करून देण्यात आली. तसेच इतर शहरातील सहभागी लोकांना प्लॅस्टिकचा वापर कसा टाळता येईल याबद्दल जागरूकता करण्यात आली.

हे ही वाचा:

एकाचा हात हाती दुसऱ्याला डोळा मारण्याच्या करामती; आंबेडकर सांगा कोणाचे?

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकीट!

राज्यात पुन्हा औरंगजेब ‘नाचला’

‘नासिरुद्दीन यांच्या फार्महाऊसवर पुरस्काराची ट्रॉफी बनली बाथरूमचे हँडल

“समुद्रकिनारे स्वच्छ असणे अत्यंत आवश्यक आहे, याचे महत्वाचे कारण म्हणजे मानवनिर्मित तयार होणार कचरा किंवा सांड पाणी जे जलचर प्राण्यांच्या जीवनावर अत्यंत गंभीर परिणाम करत आहे. यामुळेच लाखो जलचर प्राणी या प्रदूषणामुळे आपला जीव सोडत आहेत. याचा गंभीर विचार करणे गरजेचे आहे. तसेच समुद्रकिनारे हे स्थानिक पर्यटकांसाठी आणि परदेशी पर्यटकांसाठी प्रेक्षणीय स्थळे आहेत, जर त्यांची योग्य प्रकारे स्वच्छता केली नाही तर समुद्रकिनाऱ्यांबाबत वाईट प्रतिमा निर्माण होईल. त्यामुळे आपल्या शहराची प्रतिमा जपण्याची जबाबदारी आपली आहे असे आम्हाला वाटते. याच विचाराने आम्ही लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले आहे, असे फॉर फ्युचर इंडियाचे संस्थापक अध्यक्ष हर्षद ढगे यांनी सांगितले.

Exit mobile version