रिक्षा टॅक्सीचालक आणि प्रवाशांमध्ये भांडणे वाढली

रिक्षा टॅक्सीच्या जुन्या मीटर वरुण चालक आणि प्रवाशांनामद्धे वाद

रिक्षा टॅक्सीचालक आणि प्रवाशांमध्ये भांडणे वाढली

रिक्षा आणि टॅक्सी यांची भाडेवाढी संदर्भात संघटने तर्फे अनेकदा संप करण्याची मागणी करण्यात आली. सरकारने दिलेल्या वेळेनंतर रिक्षा आणि टॅक्सी यांची भाडेवाढ करून दिली. मात्र भाडेवाढ करून १ महिना उलटल्यानंतरही या चालकांनी मीटरमध्ये सुधारणा म्हणजे (केलिब्रेशन) करणास चालक टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच चालक केवळ परिवहन आयोगाच्या भाडेपत्रकानुसार दर आकारात आहेत. मात्र चालकांच्या या कृतीमुळे चालक व प्रवासी यांच्यात वाद होत असल्याचे दिसून येत आहेत. तसेच मीटर केलिब्रेशन न करणाऱ्या चालकांवर परिवहन विभागातर्फे कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच मुंबई महानगर आणि मुंबई उपनगर या शहरांतर्गत येणाऱ्या आरटीओमध्ये आता पर्यत खूप कमी प्रमाणात रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मीटरचे कॅलिब्रेशन केले आहे. तर अशी माहिती परीवहन विभागातर्फे देण्यात आली आहे. मुंबई महानगर व उपनगर अंतर्गत येणारे टॅक्सी तसेच सव्वा लाखांहून अधिक रिक्षा मुंबईच्या रस्त्यांवर फिरत आहेत. त्यापैकी वडाळा आरटीओ अंतर्गत येणाऱ्या रिक्षांची संख्या मोठी आहे. तसेच या आरटीओमध्ये आता पर्यंत १००० रिक्षांच्या मीटरमध्ये बदल करण्यात आले आहेत. तर ताडदेवमध्ये अडीच हजार टॅक्सी चालकांनी मीटरमध्ये बदल करून घेतले आहेत. तर अंधेरी व बोरिवली आरटीओमध्ये सध्या तरी कमी प्रमाणात रिक्षा व टॅक्सी वाहनांची मीटरमध्ये बदल करून घेत असल्याचे समोर येत आहेत.

हे ही वाचा:

नितेश राणेंचा मोर्चा आणि त्याच रात्री लागला मुलीचा शोध

संभाजी भिडेंनी पत्रकाराला सांगितले, आधी टिकली लाव मगचं बोलू

मुंबईत एका मुलीचे फुटपाथवरून अपहरण, दोन महिला अटकेत

राज्यातील बँकिंग घोटाळ्यांची होणार चौकशी

तसेच ऑक्टोबर महिन्याच्या अखेर पर्यंत ११ टक्के रिक्षा चालकांनी मीटर मध्ये बदल करून घेतले आहेत तर एकूण ४ टक्के टॅक्सी चालकांनी मीटर मध्ये बदल करून घेतले आहेत. याच प्रमाणे रिक्षा व टॅक्सी चालकांना ३० नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मुदतीपूर्वी मीटर मध्ये फेर बदल न केल्यास दंडात्मक कारवाईसह वाहनांचा परवाना सुद्धा रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच विलंब झाल्यास प्रतिदिन ५० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मीटरमध्ये बदल होई पर्यंत क्युआर कोडसह भाडेतक्ता दाखवून नवीन भाडे आकारू शकतात. असे आरटीओ कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version