चैत्यभूमीवर अनुयायी आक्रमक; दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदला!

चैत्यभूमीवर अनुयायी आक्रमक; दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदला!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली. दरम्यान मुंबईतील चैत्यभूमीवर पोहचलेल्या अनुयायांना पोलिसांनी रोखल्याने काही वेळेसाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या संतप्त अनुयायांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. मात्र, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता आहे.

ओमिक्रोन संसर्गाचा धोका लक्षात घेता पोलिसांनी जास्त लोकांना गर्दी केल्यास मनाई केली होती. यावेळी संतप्त अनुयायांमध्ये आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला असून, काही काळ वाद निर्माण झाला होता. दरम्यान भीम आर्मी संघटनेने दादर स्थानक परिसरात आंदोलन करून दादर स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी करत दादर स्टेशन परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे दादर परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 हे ही वाचा:

‘मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का?’

विक्रमवीर अजाझ पटेलने एमसीएला दिली ही अनोखी भेट

‘काही संकुचित वृत्तीची माणसे देशाला खाली खेचतात’

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष स्वीकारणार हिंदू धर्म…वाचा सविस्तर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणावर अनुयायी एकत्र येत असतात. यावेळी ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी न करण्याचे आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुंबई महानगर पालिकेने केले होते. त्यामुळेच पोलीस आणि अनुयायांमध्ये तणाव निर्माण झाला.

Exit mobile version