शंभू सीमेवर उशिरा रात्री संघर्ष; निहंगला लागली रबरी गोळी

शंभू सीमेवर उशिरा रात्री संघर्ष; निहंगला लागली रबरी गोळी

एकीकडे केंद्रीय मंत्री आणि शेतकऱ्यांमध्ये बैठक सुरू असताना गुरुवारी रात्री अंबालातील शंभू सीमेवर पुन्हा एकदा संघर्षाची स्थिती उद्भवली. निहंग शीख यांच्या पाठीवर रबरी गोळी लागली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. काही निहंग घग्गर उड्डाणपुलावर बॅरिकेडजवळ जाऊन पोलिसांना आव्हान देत होते. समजूत काढूनही त्यांनी न ऐकल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि रबरी गोळ्यांचा मारा केला.

बुधवारी रात्री सर्व शेतकरी शांत झाले होते आणि ट्रॅक्टरमधून माघारी गेले होते. मात्र एक ट्रॅक्टर तिथेच अडकला होता. गुरुवारी रात्री ११ वाजता अचानक काही शेतकरी सीमेवर धडकले. पोलिसांनी त्यांना मागे हटण्याचे आवाहन केले, मात्र त्यांनी ते जुमानले नाही. त्यामुळे शेतकरी आणि जवानांमध्ये पुन्हा संघर्षाची परिस्थिती उद्भवली. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने शेतकऱ्यांनीही दगडफेक केली.

हे ही वाचा:

भाजपला माझा प्रामाणिकपणा दिसला म्हणून तिकीट मिळाले!

अयोध्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने जारी केले चांदीचे नाणे

आईकडून ११वर्षीय मुलीची हत्या, स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न!

मुख्यमंत्र्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा समाजाच्या सर्व्हेक्षणाचा अहवाल स्वीकारला

काही शेतकरी अडकलेला ट्रॅक्टर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा सुरक्षा दलाने शेतकऱ्यांना जवळ न येण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांनी ते मान्य न केल्याने संघर्ष सुरू झाला. त्यानंतर शेतकऱ्यांना मागे हटावे लागले. ते ट्रॅक्टर काढू शकले नाहीत.

अमृतपाल, दीप सिद्धूच्या समर्थनार्थ पोस्टर

पंजाबमध्ये काही आंदोलकांनी अमृतपाल आणि दीप सिद्धू यांच्या समर्थनार्थ पोस्टर लावले होते. त्यावर अमृतपालच्या सुटकेची मागणी करण्यात आली होती. तर, दीप सिद्धू याच्या पोस्टरवर ही लढाई ‘फसल की नही, नस्लकी है’ असे लिहिले होते.

Exit mobile version