छत्तीसगडमध्ये पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आहे. नारायणपूर आणि दंतेवाडा सीमेवर झालेल्या या चकमकीत ३० नक्षलवाद्यांना ठार झाले आहेत. या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.
नारायणपुरचे एसपी प्रभात कुमार यांनी माहिती दिली की, दोन तासांपासून चकमक सुरु होती. आपले सर्व जवान सुरक्षित आहेत. सुरक्षा दलाच्या कारवाईत ३० नक्षली ठार झाले आहेत. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. एके-४७, एसएलआर आणि इतर शस्त्रे जप्त केली आहेत. नारायणपूर-दंतेवाडा सीमेवरील माड भागात ही चकमक झाली. शोधमोहीम सुरू आहे. पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे.
हे ही वाचा :
काँग्रेस तरुणांना ड्रग्जच्या अंधाऱ्या दुनियेत घेऊन जाऊ इच्छिते!
अभिजात भाषेचा दर्जा हा ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषेचा सन्मान
ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षाचा तुरुंगवास; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
दरम्यान, पुढील २ वर्षात नक्षलवाद संपवणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले. नक्षलवाद्यांनी शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करण्याचे आवाहनही त्यांनी केले. नक्षली हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबांनी नुकतीच दिल्लीमध्ये मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती तेव्हा ते बोलत होते.