21 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषप्रभू श्रीराम, सावरकरांचा डाव्या संघटनांकडून अपमान, अभाविप कार्यकर्त्यांचा संताप!

प्रभू श्रीराम, सावरकरांचा डाव्या संघटनांकडून अपमान, अभाविप कार्यकर्त्यांचा संताप!

डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेकडूनही आरोप

Google News Follow

Related

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सोमवारी (२८ ऑक्टोबर) रात्री यूजीएमबीच्या बैठकीदरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांमध्ये मोठा संघर्ष झाल्याचे वृत्त आहे. ‘प्रभू श्रीराम आणि सावरकर’ यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्यावरून वाद सुरू झाल्याची माहिती आहे. अभाविपने डाव्या विद्यार्थी संघटनांशी संबंधित असलेल्या एका विद्यार्थ्याच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप नोंदवला. त्यानंतर वाद वाढला आणि दोन्ही विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली.

वास्तविक, २८ ऑक्टोबर रोजी, यूजीएमबी (युनिव्हर्सिटी जनरल बॉडी मीटिंग) अंतर्गत तक्रार समितीच्या (IIC)  स्थापनेसंदर्भात एक बैठक झाली. याच दरम्यान, डाव्या आणि अभाविप विद्यार्थी संघटनांमध्ये विविध मुद्द्यांवर वाद झाला, मात्र एका विद्यार्थ्याने असे वक्तव्य केले, ज्यामुळे वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. अभाविपशी संबंधित विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, भाषणादरम्यान डावे सदस्य म्हणाले की “…सावरकर आणि प्रभू श्रीराम हे अभाविपच्या कार्यकर्त्यांचे आदर्श आहेत.

हे ही वाचा : 

बांगलादेशमध्ये छळ झालेल्या हिंदूंच्या न्यायाच्या आशा संपल्या

‘प्रकल्पांना विरोध करायचा, मग ओरड करायची, हेच विरोधकांचे धोरण’

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देऊन आर. आर. पाटलांनी केसाने गळा कापला

तिहार जेलचा वॉर्डनच चालवत होता ड्रगची प्रयोगशाळा, ९५ किलो ड्रग्ज छाप्यात जप्त!

यावर डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांशी संबंधित विद्यार्थ्यांनीही आरोप केला आहे. ते म्हणाले की, जवाहरलाल नेहरू स्टुडंट्स युनियनचे (जेएनयूएसयू) संयुक्त सचिव साजिद यांना अभाविपच्या सदस्यांनी धमकी दिली की, गप्प राहा , अन्यथा नजीबप्रमाणे गायब केले जाईल. त्याचवेळी जेएनयूएसयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष धनंजय यांनी अभाविपच्या विद्यार्थ्यांनी आपला अपमान केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, या बैठकीचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. दोन्ही गट घोषणाबाजी करताना दिसत आहेत.

दरम्यान, यामध्ये डाव्या विचारसारणीच्या विद्यार्थ्यांनी नजीब अहमदचा उल्लेख केला आहे. उत्तर प्रदेशातील बदाऊन येथील रहिवासी असलेल्या नजीब अहमदला जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) एमएससी बायोटेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेऊन वैज्ञानिक बनायचे होते. १४ ऑक्टोबर २०१६ च्या रात्री कॅम्पसमध्ये असलेल्या वसतिगृहात नजीब अहमद आणि काही विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले आणि १५ ऑक्टोबर रोजी माही-मांडवी वसतिगृहातून नजीब अहमद हा अचानक बेपत्ता झाला. १७ ऑक्टोबर रोजी, त्याच्या कुटुंबासह विद्यापीठ व्यवस्थापनाने दिल्ली पोलिसांकडे त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र, आठ वर्षानंतरही त्याच्याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा